🌀 दमानियांनी फोडला मोठा बॉम्ब! धनंजय मुंडेंवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप, थेट पुरावेच मांडले!

 🌀 दमानियांनी फोडला मोठा बॉम्ब! धनंजय मुंडेंवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप, थेट पुरावेच मांडले!

वृत्त एकसत्ता न्यूज

माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव 

आकाश भाग्यवंत नायकुडे

मुंबई दिनांक 04/02/2025 : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्या खळबळजनक आरोप केला आहे. मुंडे कृषीमंत्री असताना नॅनो युरिया, नॅनो डीएपी आणि फवारणी पंपाच्या खरेदीत भ्रष्टाचार झाला आहे. 92 रूपयांची नॅनो युरियाची बॅग 220 रूपयांना धनंजय मुंडेंनी घेतली, असा आरोप दमानिया यांनी केला आहे. त्या मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होत्या.

अंजली दमानिया म्हणाल्या, "तत्कालीन कृषीमंत्री शेतकऱ्यांचे पैसे कायदा पायदळी तुडवून किती खातात, कसे खातात, याचे मी पुरावे देणार आहे. नॅनो युरिया, नॅनो डिएपी आणि बॅटरीचे फवारणी यंत्र, मेटाल्ट डेहाइड आणि कापूस गोळा करण्यासाठी बॅगा खरेदीत भ्रष्टाचार झाला आहे."

🌀88 कोटींचा घोटाळा*

"नॅनो युरिया आणि नॅनो डीएपी हे एकाच कंपनीचे प्रोडक्ट आहेत. धनंजय मुंडेंच्या अध्यक्षतेखाली 92 रूपयांना मिळणारी 'नॅनो युरियाची' बाटली 220 रूपयांना विकत घेतली. 269 रूपयांना मिळणारी 'नॅनो डीएपी'ची बाटली 590 रूपयांना खरेदी केली आहे. नॅनो युरिया आणि नॅनो डीएपीचा या दोन्ही वस्तूंचा घोटाळा फक्त 88 कोटींचा आहे."

*भ्रष्टाचार म्हणायचे का काय म्हणायचे?

"बॅटरीचे फवारणी यंत्र 2450 रूपयांना घेऊन हेच 'एमएआयडी'सीच्या संकेतस्थळावर 2946 रूपयांना विकले जात आहे. परंतु, तत्कालीन कृषीमंत्री मुंडेंनी याची 3425 रूपयांना खरेदी केली होती. याला भ्रष्टाचार म्हणायचे का काय म्हणायचे? तुम्ही एक फवारणी यंत्रातून एक हजार रूपये कमावले आहेत. 2 लाख 36 हजार 427 बॅटरी फवारणी यंत्र खरेदी केले होते. त्यासह गोगगायींचा प्रादूर्भाव कमी करण्यासाठी मेटालडायहाइड हे वापरले जाते. हे 817 रुपयांना मिळते. पण, धनंजय मुंडेंनी एक लाख 96 हजार किलो मेटालडायहाइड हे 1275 रूपये किलोप्रमाणे विकत घेतले," अशी माहिती दमानिया यांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या