ओंकार साखर कारखाना परिवाराला साखर उद्योगातील आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान

 

ओंकार साखर कारखाना परिवाराला

साखर उद्योगातील आंतरराष्ट्रीय  पुरस्कार  प्रदान 

वृत्त एकसत्ता न्यूज

आकाश भाग्यवंत नायकुडे

निमगाव दिनांक 02/02/2025 : ओंकार साखर कारखाना परिवाराला साखर उद्योगातील "सर्वात जलद आधिग्रहण पुरस्कार" हा आंतरराष्ट्रीय  पुरस्कार  प्रदान करण्यात आला.

ओंकार साखर कारखाना परिवाराने ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या व कर्मचारी वर्ग, ऊसतोड कामगारांसाठी भरीव योगदान देऊन आर्थिक प्रगती साधुन सर्व युनिट मधील त्या त्या भागाचा कायापालट केला याची दाखल घेऊन नवी दिल्ली येथील  शिया 2025 मधील साखर उद्योगातील आंतरराष्ट्रीय  पुरस्कार चिनीमुंङी फेस्टिव्हल मध्ये  सिने आभिनेत्री हिनाखान यांच्या  हस्ते ओंकार साखर कारखाना परिवाराचे संचालक ओमराजे बोत्रे पाटील यांना समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला. ओंकार साखर कारखाना परिवाराचे चेरअमन बाबुराव बोत्रे-पाटील  संचालिका रेखाताई बोत्रे-पाटील, संचालक प्रशांतराव बोत्रे-पाटील  यांनी गेल्या पाच वर्षांपुर्वी बंद असलेल्या साखर कारखान्यांना ऊर्जीत अवस्थेत आणुन शेतकऱ्यांचा ऊसाचा प्रश्न  सोङवुन ग्रामीण भागाचा कायापालट करण्याचा प्रयत्न केला. अनेकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या.  अनेक सामाजिक उपक्रम राबविले. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाङा, विदर्भात साखर कारखाने जलद चालु करून   ऊसाचे गाळप केले याची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल ऊस उत्पादक शेतकरी आधिकारी कर्मचारीवर्ग वाहतुकदार व्यवसाईक यांनी बोत्रे-पाटील  यांचे अभिनंदन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या