💢 बेळगाव जिल्ह्यातील प्रसिद्ध श्री मायाक्का देवी यात्रेस प्रारंभ! 🔰 ही यात्रा प्राचीन काळापासून चालत आलेली परंपरा आहे.

💢 बेळगाव जिल्ह्यातील प्रसिद्ध श्री मायाक्का देवी यात्रेस प्रारंभ! 

🔰 ही यात्रा प्राचीन काळापासून चालत आलेली परंपरा आहे.

वृत्त एकसत्ता न्यूज

संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे

मुंबई दिनांक 13/02/2025 : कर्नाटक -महाराष्ट्र राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री मायाक्का देवी चिंचली ता. रायबाग जि. बेळगांव येथील यात्रेला आजपासून सुरुवात झाली आहे. उत्तर कर्नाटकातील प्रसिद्ध शक्ती, व नवसाला पावणारी देवी असलेली श्री मायाक्का देवीची यात्रा चालू असून महिनाभर ही यात्रा चालते. 

प्रत्येक वर्षी ही यात्रा भारत पौर्णिमेच्या दिवशी सुरवात होते व यात्रेच्या चौथ्या दिवशी श्री मायाक्का देवीची पालकी मिरवणूक कार्यक्रम होतो.

ही यात्रा प्राचीन काळापासून चालत आलेली परंपरा आहे. कर्नाटक महाराष्ट्रातील लाखो भक्त श्री मायाक्का दर्शनासाठी यात्रेच्या काळात येतात. महाराष्ट्रातील, कोकण भागासह, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, मुंबई, नाशिक, भीड यासह कर्नाटकातील बेळगाव, विजापूर, बागलकोट, गुलबर्गा या जिल्यातील भाविक प्रत्येक वर्षी यात्रा काळात स्वच्छ भावनेने चिंचली येथे श्री मायाक्का दर्शनासाठी येतात. चिंचली येथील जितेंद्र जाधव (चिंचलीकर सरकार )सरकार व चिंचली गावातील नागरिक बाहेरहुन येणाऱ्या लाखो भाविकांचे सोय करतात. 

|| देवी मायाक्का महात्म्य ||

या जगात असुरी शक्तीनी ज्यावेळी थैमान घातले त्यावेळी जगा मध्ये धर्माचे संरक्षण करण्याकरिता आपल्या देवी-देवतांना अवतार घ्यावा लागला.

ज्याप्रमाणे बिरोबा देवाने क्वाण्यासुर दैत्य मारला आणि पृथ्वी भयमुक्त केली त्याचप्रमाणे मायक्काने किल-कट्ट दैत्याचे वध करुन जनता भयमुक्त केली. 

मंदनगिरी नगरामध्ये राहणाऱ्या अक्का  व अक्का मायक्का या दोन भगिणींनी कुदळीनंदन वनात सापडलेला बाळ बिरोबाचा पाळणा घरी नेला. ह्या लहान बाळाचा मोठ्या वात्सल्याने व प्रेमाने सांभाळ केला. पुढे बिरुदेव लहानाचे मोठे झाल्यानंतर कण कामावतीशी त्यांचा विवाह सोहळा पार पडला. पुढे अवतार कार्य करत असताना अक्का एकव्वा व मायव्वा ह्या भ्रमंती करत चिंचणी नगरात येऊन .उन्मत्त झालेल्या व देवता कडून वरदान मिळवले त्या दृष्ट किल व कट्ट दैत्याचे वध केले व तिथेच हिराबाईच्या वाड्यात नांदू लागल्या तिथे त्यानी कायमचे वास्तव्य केले व भक्त कल्याण करु लागल्या. सर्व जाती धर्मामध्ये ही देवी वास करत असून भक्ताच्या हाकेला ओ देणारी देवी म्हणून प्रसिद्ध पावली आहे. 

नवान्न पोर्णिमेला या देवीची मोठी यात्रा भरते आंध्र, कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा या राज्यातून लाखो भाविक देवीचे दर्शन घेतात व आपल्या कुटुंबाला मुला बाळाना प्रपंचा मध्ये सुख मागून घेतात. तरी आपण एकदा तरी या देव स्थानाला भेट देऊन यात्रा पहावी व दर्शन घेऊन आशिर्वाद घ्यावा. चिंचली,ता.रायबाग,जि.बेळगाव 

संकलन :- सतीश अलोणी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या