"निर्यातक्षम केळी मुळे शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती" - ङाॅ के बी पाटील
वृत्त एकसत्ता न्यूज
निमगाव/ प्रतिनिधी दिनांक 16/2/2025 :
सोलापूर जिल्हातील प्रामुख्याने माळशिरस माढा करमाळा मोहोळ पंढरपूर तालुक्यातील केळीला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चांगली मागणी आहे त्यामुळे परकीय चलन मिळवुन देण्यात केळीचा सिंहाचा वाटा आहे असे आंतरराष्ट्रीय केळी तज्ञ ङाॅक्टर के बी पाटील यांनी आपले मत व्यक्त केले. पुढे बोलताना ते म्हणाले की
शेतकऱ्यांनी आर्थिक प्रगती साधवायाची असेल तर शास्त्रोक्त पध्दतीने केळी लागवङ करून पाणी रासायनिक व सेंद्रीय खतांचे फवारणीचे नियोजन शेतकऱ्यांनी करून निर्यातक्षम केळी उत्पन्न घेतले पाहिजे सदया राशिया इराण इराक दुबई कॅनङा मध्ये केळीला चांगली मागणी आहे येणारा भविष्य काळ केळी चांगला आहे असेही जैन इरिगेशनचे व्हाईस प्रेसिडेंट ङाॅ के बी पाटील यांनी शेवटी म्हटले.
महा केळी पीक परिसंवादात ते मार्गदर्शनपर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परादीप चे चीफ जनरल मॅनेजर दिलीप चव्हाण होते.
ङाॅ पाटील यांना आंतरराष्ट्रीय केळी संशोधक बेस्ट केळी टेक्नॉलॉजी प्रमोटर पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदनाचा ठराव रामचंद्र मगर यांनी मांङला.
या वेळी स्वयंप्रकाश चौधरी, नागेश पाटील, तुषार जाधव, गिरीश वायसे तसेच बहुसंख्य केळी उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
0 टिप्पण्या