भारताची ६४.८२ ट्रिलियन अमेरिकी डॉलर इतकी लूट इंग्रजांनी केली

वृत्त एकसत्ता न्यूज

संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे

मुंबई दिनांक 24/01/2025 :

'सोने की चिडीया' अशी ओळख असणाऱ्या भारत भूमीवर जवळपास १५० वर्षे परकियांनी अर्थात ब्रिटीशांनी राज्य केलं. कैक वर्षे देशावर अधिपत्य गाजवणाऱ्या याच ब्रिटीशांनी देशातील सामान्यांना वेठीस धरलं, त्यांच्यावर अत्याचार केले, इतकंच काय तर त्यांनी गुरांप्रमाणे वागवलं आणि राबवलं सुध्दा. अखेर स्वातंत्र्यलढ्याच्या तलवारीची धार आणखी वाढली आणि सरते शेवटी भारतीयांच्या जिद्दी पुढं, त्यांनी दिलेल्या लढ्यापुढं ब्रिटीशराजही माघार घेत देशातून हद्दपार झालं. 

इंग्रज भारतातून गेले खरे, पण दरम्यानच्या वर्षांमध्ये त्यांनी भारताची मोठी लूट केली. ऑक्सफॅन इंटरनॅशनल रिपोर्ट मधून याच संदर्भातील संपूर्ण माहिती प्रसिद्ध करण्यात आली असून, ब्रिटीशांनी भारतातून अब्जावधींची संपत्ती आपल्या 

सोबत नेली. ब्रिटननं भारतावर राज्य केल्यानंतर इथून जितक्या संपत्तीची लूट केली तिचा आकडा प्रचंड मोठा होता. १७६५ ते १९०० दरम्यानच्या काळात ब्रिटननं भारतातून एकूण ६४.८२ ट्रिलियन अमेरिकी डॉलर इतकी संपत्ती आपल्या देशी नेली. फक्त भारतच नव्हे, तर इतरही अनेक देशांमध्ये वसाहती स्थापन करत पुढे याच देशांना गुलामगिरीच्या विळख्यात ओढत तिथूनही ब्रिटीशांनी अशीच संपत्ती लुटली. 

भारतातून लुटलेल्या सर्वाधिक रकमेचा एक मोठा भाग ब्रिटनच्या १० टक्के श्रीमंतांकडे गेला. ही रक्कम होती जवळपास ३३.८ ट्रिलियन डॉलर. ही रक्कम इतकी मोठी आहे की, ती ५० ब्रिटीश पाऊंडच्या हिशोबानं मोजली जाईल, तर एकटं लंडन शहर ४ वेळा फक्त आणि फक्त नोटांच्या ढिगानं झाकलं जाईल. वसाहतीकरणामुळं एका असमान जगाचा पाया पडला, जिथं श्रीमंत कायमच श्रीमंत राहिले आणि गरीब देशातील धनाचा संपूर्ण ओघ हा याच श्रीमंत राष्ट्र आणि श्रीमंत समाजाकडे वाहत राहिला. या महत्त्वपूर्ण अहवालाला 'टेकर्स, नॉट मेकर्स' अशा शीर्षकासह प्रसिध्द करण्यात आलं आहे. १७५० मध्ये जागतिक औद्योगिक क्षेत्रात भारताचं योगदान २५ टक्के इतकं होतं. पण, १९०० वर्षापर्यंत हा आकडा घसरून २ टक्क्यांवर पोहोचला. यास महत्त्वाचं कारण ठरला तो म्हणदे वसादहतवाद आणि ब्रिटनकडून भारतात केली गेलेली लूट. संसाधनं आणि आर्थिक पाठबळा अभावी भारतातील औद्योगिक क्षेत्राला मोठा धक्का बसला आणि देश पिछाडीवर गेला.

सौजन्य : Zee News

संकलन : मिलिंद पंडित, कल्याण

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या