मेंढपाळांना ८५ टक्के अनुदानावर ट्रॅक्टर ट्रॉली शासनाने द्यावे - संजय वाघमोडे

 


मेंढपाळांना ८५ टक्के अनुदानावर ट्रॅक्टर ट्रॉली शासनाने द्यावे - संजय वाघमोडे 

वृत्त एकसत्ता न्यूज

आकाश भाग्यवंत नायकुडे

मुंबई दिनांक 22 जानेवारी 2025 :

पाटणे :- राज्यातील मेंढपाळांना ८५ टक्के अनुदानावर ट्रॅक्टर ट्रॉलीसह उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी यशवंत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व मेंढपाळ विकास समितीचे राज्य सदस्य संजय वाघमोडे यांनी केली ते पाटणे तालुका शाहूवाडी येथे संघटनेच्या शाखा शुभारंभ निमित्त आयोजित मेंढपाळ मेळाव्यात बोलत होते. यावेळी डॉ. श्याम कोळेकर सहाय्यक आयुक्त शाहुवाडी, सुनील शेळके, जिल्हा संपर्क प्रमुख, भरत नाईक, जिल्हाध्यक्ष मल्हार क्रांती, यशवंत वाकसे, सुभाष वगरे, यशवंत वाकसे, हातकणगले तालुका अध्यक्ष, अतुल धनगर पन्हाळा तालुका युवक अध्यक्ष, मारुती पाटील सरपंच, आंनदा बंडगर,(मा. सरपंच पाटणे) बाबुराव कोळेकर, उत्तम तांदळे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. प्रारंभी गावातून ढोल कैताळाच्या गजरात व फटाक्यांच्या आतिषबाजीत मिरवणूक काढण्यात आली. 

बोलताना ते पुढे म्हणाले की राज्यातील मेंढपाळांना स्थलांतर करताना त्यांच्या कडील साहित्य, अन्नधान्य, करडे, कोकरे, स्वतःची मुले इत्यादी घोड्यावर किंवा डोक्यावर घेऊन  एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करावे लागते. असे करताना त्यांना अनेक अडचणी निर्माण होतात तसेच ऊन वारा पाऊस व वन्य प्राणी यांच्यापासून सुरक्षा करणे हे धोक्याचे असते त्याऐवजी त्यांना ८५ टक्के अनुदानावर व १५ टक्के लाभार्थी हिस्सा अशा पद्धतीने  पन्नास एचपी ट्रॅक्टर, व ट्रॅक्टरला जोडून फिरवता येईल असे ट्राँली घर, सौरदिवे, सौर चूल, व पिण्याच्या पाण्याची टाकी, सीसीटीव्ही कॅमेरे,  फोल्डिंगचे फिरते शेळी मेंढी शेड (वाघर) इत्यादी साहित्य एकत्र करून त्याचे कीट तयार करावे व त्या किटला शासनाने भाग भांडवल म्हणून 85% व लाभार्थी हिस्सा 15% अशा पद्धतीने मेंढपाळ किट करून मेंढपाळांना  दिल्यास भटकंती करण्यास त्यांना अडचणी येणार नाहीत. तसेच पावसापासून वारा पाऊस यापासून त्यांचे संरक्षण होईल  शासनाने असे किट मेंढपाळांना उपलब्ध करून द्यावे याबाबत राज्य मेंढपाळ विकास समितीच्या बैठकीत मुद्दा उपस्थित करून  मेंढपाळांना असे किट देऊन स्थलांतरित करताना त्यांचे साहित्य ने आण करणे सोपे व्हावे. यासाठी प्रयत्न करणार आहे. यासाठी सर्व मेंढपाळांनी संघटित होणे गरजेचे आहे असेही त्यांनी आवाहन केले. 

डॉ. श्याम कोळेकर यांनी बोलताना सांगितले की मेंढी व्याली की तात्काळ मेंढीच्या पिलाला मेंढीचा चिक पाजावा. व नाळ कापल्यानंतर तिथे आयोडीन लावावे. असे केल्याने गुडघे सुजण्याचे थांबते  मेंढ्यांच्या प्रजनन काळात त्यांना मक्याचे खाद्य दिल्यास मेंढ्यांची प्रजनन क्षमता वाढते जास्त मेंढ्या पाळून कमी उत्पन्न घेण्यापेक्षा कमीत कमी मेंढ्या पळून जास्तीत जास्त उत्पन्न चांगल्या प्रकारे संगोपन केल्यास मिळते. 

    यावेळी धुळाप्पा तुकाराम कारंडे शाखा संपर्कप्रमुख, आदिनाथ बाळू कारंडे, अध्यक्ष, तुकाराम विष्णू राणे, (बहिरेवाडी) उपाध्यक्ष, अनिल वासुदेव चौगुले (सावे), सेक्रेटरी, मारुती रामचंद्र धनगर (साळशी), खजिनदार, बिराप्पा कारंडे, शुभम कारंडे, संभाजी पाटील, (सावे), सुनील नलवडे (सावे), बाळू कारंडे, तानाजी कारंडे, शुभम कारंडे (राघू) दादासो कारंडे, प्रणय बंडगर, तुकाराम कारंडे, शंकर कारंडे, प्रतिक धनगर (साळशी), विराज धनगर (साळशी) विष्णू राणे (बहिरेवाडी), आयुष कारंडे, साहिल कारंडे, आदर्श बंडगर, राजवीर कारंडे, अमोल चौगुले (सावे), सुयश नलवडे, शौर्य नलवडे, यांची सदस्यपदी निवड करण्यात आली. नुतन पदाधिकाऱ्यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सोमा बंडगर यांनी केले. 

      कार्यक्रमास भीमराव दादू जानकर शाखाप्रमुख किसन युवराज जानकर अध्यक्ष सागर मधुकर जानकर उपाध्यक्ष मायाप्पा बापू शिसाळ सेक्रेटरी हाय बत्ती शामराव जानकर खजिनदार सदस्य प्रकाश जानकर सर्जेराव जानकर सर्जेराव शामराव जानकर चेअरमन महादेव जानकर सुरेश आनंदा मुडळे. अध्यक्ष विजय धोंडीराम मुडळे. उपाध्यक्ष संजय श्रीपती मुडळे. सेक्रेटरी दत्तात्रय रंगराव मुडळे. शाखा संपर्क प्रमुख  संदिप बापु मुडळे. सदस्य रघुनाथ आण्णा मुडळे.सदस्य , विश्वास आण्णा मुडळे. सदस्यवसंत वग्रे, दादू वग्रे, सदाशिव वग्रे, नामदेव वग्रे, नागेश वग्रे, विष्णू वग्रे, ईश्वर वग्रे, कोंडीबा वग्रे,बाबासो वग्रे, प्रकाश वग्रे, तात्या,दादा वग्रे, दादासो वग्रे

 अवघड वग्रे, संग्राम बंडगर, संजय बंडगर,सागर वग्रे, विलास लवटे,आनंदा बंडगर, रायसिंग सिसाळ,राजेंद्र सिसाळ, प्रताप वाघमोडे, सोनवडे, डोणोली, शिवारे, सरुड,चरण, तसेच पाटणे येथील समाज बांधव व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या