बाळासाहेब आप्पासाहेब मगर यांना काँग्रेस पक्षा तर्फे "पक्ष एकनिष्ठ सन्मान पत्र" बहाल

 

बाळासाहेब आप्पासाहेब मगर यांना काँग्रेस पक्षा तर्फे "पक्ष एकनिष्ठ सन्मान पत्र" बहाल 

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे

मुंबई दिनांक 8 जानेवारी 2025 :

काँग्रेस स्थापना दिनाचे औचित्य साधून बाळासाहेब आप्पासाहेब मगर ( रा. निमगाव मगराचे तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर) यांना काँग्रेस पक्षा तर्फे "पक्ष एकनिष्ठ सन्मान पत्र" देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे, खासदार प्रणिती शिंदे, माजी गृहमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, माजी आमदार विश्वनाथ चाकोते यांच्या हस्ते बहाल करण्यात आले.

सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी सोलापूर यांच्यावतीने दिनांक 28 डिसेंबर रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस स्थापना दिनानिमित्त सन्मान सोहळा 2024- 25 आयोजित करण्यात आलेला होता.

दिनांक 28 डिसेंबर हा दिवस भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष स्थापना दिवस आहे. दिनांक 28 डिसेंबर 1885 साली एलेन ओक्टोवियन  ह्युम, दादाभाई नौरोजी, दिनशा वाचा यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची स्थापना केली. काँग्रेस पक्षाचे पहिले अध्यक्ष ख्यातनाम वकील ओमेशचंद्र बॅनर्जी हे होते. तेव्हापासून भारत देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी काँग्रेस पक्षाचा सिंहाचा वाटा आहे. महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू घराण्याची परंपरा लाभलेल्या काँग्रेस पक्षाने भारतीय स्वातंत्र्यलढ्यात आणि स्वातंत्र्यानंतर महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

आपणही भारतीय स्वातंत्र्यलढ्यापासून आजपर्यंत काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून समाज उपयोगी कार्य करत आहात. पक्षाशी एकनिष्ठ राहून संघटना व पक्ष वाढीसाठी कार्य करत आहात. या कार्याची दखल घेऊन शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज काँग्रेस स्थापना दिनाच्या उच्च साधून देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे साहेब, कर्तव्यदक्ष सोलापूरचे खासदार प्रणिती ताई शिंदे, माजी गृहमंत्री सिद्धराम म्हेत्रे, माजी आमदार विश्वनाथ चाकोते यांच्या हस्ते आपणास सन्मानपत्र देऊन आज रोजी सन्मान करीत आहोत याचा आम्हाला आनंद होत आहे. यापुढेही काँग्रेस पक्षाचे ध्येय धोरण तळागाळातील लोकांपर्यंत आपण पोहोचवणार या शंका नाही आपल्या हातून असेच कार्य घडावे अशी सदिच्छा!!! असा मजकूर असलेल्या सन्मानपत्रावर सोलापूर शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष चेतन नरोटे आणि कार्याध्यक्ष नंदकुमार पवार, वरिष्ठ उपाध्यक्ष प्रसिद्धी विभाग प्रमुख सातलिंग शटगार इत्यादींचा नामोल्लेख आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या