श्रीमती लोचना मोहन जाधव यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 22/01/2025 :
आंबेडकर चौक अकलूज (तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर )येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती लोचना मोहन जाधव (वय 68 वर्षे) यांचे मंगळवार दिनांक 21 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. त्यांचे पश्चात एक मुलगा, एक मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे. आंबेडकर चौक अकलूज येथील बॅकवर्ड हाऊसिंग सोसायटी मधील अतिक्रमण निघून तेथील पात्र अतिक्रमणधारकांना त्याच ठिकाणी नावावर जागा करून मिळून घरकुल बांधून मिळावे यासाठी उभारलेल्या लढ्यामध्ये केलेल्या आमरण उपोषणामध्ये त्या अग्रभागी होत्या. अत्यंत हुशार असलेल्या जिद्दी व्यक्तिमत्त्वाचे आकस्मित निधनाने परिसरात शोक कळा पसरली आहे. अकलूज येथील अकलाई वैकुंठ स्मशानभूमी येथे त्यांचे पार्थिवावर अंतिम दाह संस्कार करण्यात आले. कालकथित श्रीमती लोचना मोहन जाधव या पत्रकार आदिनाथ मोहन जाधव सर यांच्या मातोश्री होत.

0 टिप्पण्या