🟣 पालकमंत्र्यांची यादी जाहीर; धनंजय मुंडे यांना संधी नाहीच, भरत गोगावले यांचाही पत्ता कट; अजित पवारांनी बीडचे पालकमंत्रिपद स्वत:कडे ठेवले तर रायगडच्या पालकमंत्रिपदी आदिती तटकरे यांची वर्णी

 🟣 पालकमंत्र्यांची यादी जाहीर; धनंजय मुंडे यांना संधी नाहीच, भरत गोगावले यांचाही पत्ता कट; अजित पवारांनी बीडचे पालकमंत्रिपद स्वत:कडे ठेवले तर रायगडच्या पालकमंत्रिपदी आदिती तटकरे यांची वर्णी

वृत्त एकसत्ता न्यूज

आकाश भाग्यवंत नायकुडे

मुंबई दिनांक 18 जानेवारी 2025 :

बहुप्रतिक्षित पालकमंत्रिपदाची घोषणा अखेर करण्यात आली आहे. रायगड, बीड, जळगाव या जिल्ह्याचे पालकमंत्रिपद कुणाला मिळणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्याची प्रतिक्षा आता संपली आहे. अजित पवारांनी बीडचे पालकमंत्रिपद स्वत:कडे ठेवले आहे. तर रायगडच्या पालकमंत्रिपदी आदिती तटकरे यांचीच वर्णी लागली आहे. जळगावचे पालकमंत्रिपद मात्र गुलाबराव पाटील यांना मिळाले आहे.

गडचिरोली- देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस, मुख्यमंत्री

ठाणे- एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे, ठाणे उपमुख्यमंत्री

मुंबई शहर- एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे, उपमुख्यमंत्री

पुणे- अजित आशाताई अनंतराव पवार, उपमुखमंत्री

बीड- अजित आशाताई अनंतराव पवार, उपमुखमंत्री

नागपूर- चंद्रशेखर प्रभावती बावनकुळे

अमरावती- चंद्रशेखर प्रभावती बावनकुळे

आहिल्यानगर-राधाकृष्ण सिंधुताऊ एकनाथराव विखे पाटील

वाशिम- हसन सकिना मियालाल मुश्रीफ

सांगली- चंद्रकांत सरस्वती बच्चू पाटील

नाशिक- गिरीश गीता दत्तात्रय महाजन

पालघर- गणेश सुभद्रा रामचंद्र नाईक

जळगांव- गुलाबराव रेवाबाई रघुनाथ पाटील

यवतमाळ- संजय प्रमिला दुलिचंद राठोड

मुंबई उपनगर- आशिष मिनल बाबाजी शेलार, मंगलप्रभात प्रेमकंवर गुमनमल लोढा( सहपालकमंत्री)

रत्नागिरी- उदय स्वरूपा रविंद्र सामंत

धुळे- जयकुमार नयनकुवर जितेंद्रसिंह रावल

जालना- पंकजा प्रज्ञा गोपीनाथ मुंडे

नांदेड- अतुल लिलावती मोरेश्वर सावे

चंद्रपूर- डॉ.अशोक जनाबाई रामाजी उईके

सातारा- शंभूराज विजयादेवी शिवाजीराव देसाई

रायगड- आदिती वरदा सुनिल तटकरे

लातूर- शिवेंद्रसिंह अभयसिंहराजे भोसले

नंदूरबार- माणिकराव सरस्वती शिवाजी कोकाटे

सोलापूर- जयकुमार कमल भगवानराव गोरे

हिंगोली- नरहरी सावित्रीबाई सीताराम झिरवाळ

भंडारा- सजय सुशीला वामन सावकारे

छत्रपती संभाजीनगर- संजय शंकुतला पांडुरंग शिरसाट

धाराशिव- प्रताप इंदिराबाई बाबुराव सरनाईक

बुलढाणा- मकरंद सुमन लक्ष्मणराव जाधव (पाटील)

सिंधुदुर्ग- नितेश निलम नारायण राणे

अकोला- आकाश सुनिता पांडुरंग फुंडकर

गोदिंया- बाबासाहेब शांताबाई मोहनराव पाटील

कोल्हापूर- प्रकाश सुशीला आनंदराव आबिटकर, माधुरी मीरा सतीश मिसाळ(सहपालकमंत्री)

गडचिरोली- आशिष उमादेवी नंदकिशोर जयस्वाल (सहपालकमंत्री)

वर्धा- डॉ. पंकज कांचन राजेश भोयर

परभणी- मेघना दीपक साकोरे बोर्डीकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या