श्रीमती मंगल श्रीकृष्ण कुलकर्णी यांचे वृद्धापकाळाने निधन

 

श्रीमती मंगल श्रीकृष्ण कुलकर्णी यांचे वृद्धापकाळाने निधन 

वृत्त एकसत्ता न्यूज

आकाश भाग्यवंत नायकुडे

मुंबई दिनांक 10 जानेवारी 2025 : तांबवे (तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर) येथील तांबवेकर कुलकर्णी कुटुंबातील जेष्ठ सदस्या श्रीमती मंगल  श्रीकृष्ण कुलकर्णी (वय 94 वर्षे ) यांचे वृद्धापकाळाने   शुक्रवार दि.10 रोजी सकाळी 8:35 वाजता निधन झाले. 

 त्यांचे पश्चात 3  मुले, 3 मुली, नातवंडे, परतवंडे, असा मोठा परीवार आहे. त्यांनी ग्रामपंचायत तांबवे उपसरपंच पद भूषविले आहे. तसेच अकलूज परीसरातील भजनीमंडळातील असंख्य महिलांना भजन शिकविल्यामुळे त्यांची धार्मिक क्षेत्रास ओळख होती. त्यांचे निधनाने तांबवे परीसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. ॲड. प्रमोद कुलकर्णी यांच्या त्या आजी (आईच्या आई) होत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या