💢 "रक्तदान ही सर्वात मोठी सेवा, या उपक्रमामुळे अनेकांना नवजीवन मिळू शकते"- खा.धैर्यशील मोहिते-पाटील
🔰 खा.धैर्यशील मोहिते-पाटील व सौ.शितलदेवी मोहिते-पाटील यांनीही केले रक्तदान
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 22 जानेवारी 2025 : "रक्तदान ही सर्वात मोठी सेवा, या उपक्रमामुळे अनेकांना नवजीवन मिळू शकते. युवकांनी अशा उपक्रमांत उत्साहाने सहभागी होणे गरजेचे आहे." असे मत खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी व्यक्त केले. सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील यांच्या जयंतीनिमित्त शिवरत्न शिक्षण संस्था व शिवपार्वती सार्वजनिक ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने नॉलेज सिटी येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
या शिबिरात सामाजिक बांधिलकी जपत १०० हून अधिक जणांनी रक्तदान केले. विशेष म्हणजे, या शिबिरात खासदार धैर्यशिल मोहिते-पाटील व संस्थेच्या अध्यक्षा शितलदेवी मोहिते-पाटील यांनी स्वत: रक्तदान करून आदर्श घालून दिला.
कार्यक्रमात संस्थेच्या अध्यक्षा शितलदेवी मोहिते-पाटील, सचिव धर्मराज दगडे, अश्रफ शेख, प्रा.सुभाष शिंदे, प्रा.भारत साठे, NSS समन्वयक अनिल लोंढे, तानाजी मदने व इतर मान्यवर व विद्यार्थी उपस्थित होते. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी दोन्ही संस्थेने विशेष मेहनत घेतली. या उपक्रमातून तरुण पिढीला सामाजिक कार्याबाबत प्रेरणा मिळाली असल्याचे मान्यवरांनी सांगितले.



0 टिप्पण्या