जलशक्ती मंत्रालयाच्या वॉटर रिसोर्स कमिटीचा अभ्यास दौर्‍यात खासदार धर्यशील मोहिते पाटील यांचा सन्मान

 

जलशक्ती मंत्रालयाच्या वॉटर रिसोर्स कमिटीचा अभ्यास दौर्‍यात खासदार धर्यशील मोहिते पाटील यांचा सन्मान

वृत्त एकसत्ता न्यूज


ळसंकलन :आकाश भाग्यवंत नायकुडे

मुंबई दिनांक 11 जानेवारी 2025 : चेन्नई येथे सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प व चैन्नई पेट्रोलियम - कॉर्पोरेशन लिमिटेड (CPCL) प्रकल्पांना जलशक्ती मंत्रालयाच्या वॉटर रिसोर्स कमिटीने अभ्यास दौऱ्यादरम्यान भेट दिली. या दौऱ्यात कमिटी सदस्य खासदार  धैर्यशील मोहिते-पाटील सहभागी होते.

दौऱ्याचा मुख्य उद्देश CPCL मध्ये पेट्रोलियम-आधारित कचऱ्याचे व्यवस्थापन, शुद्ध सांडपाण्याचा पुनर्वापर (TWW), आणि पेट्रोलियम प्रक्रियेतून निर्माण होणाऱ्या गाळाच्या सुरक्षित विल्हेवाटीसाठी वापरले जाणारे उपाय. अभ्यास करणे हा होता. जलशक्ती मंत्रालय, CPCL, आणि राज्य विभागांमधील सामंजस्य आणि सहकार्याच्या संधींवर, पर्यावरणपूरक तंत्रज्ञान आणि प्रकल्पांसाठी नियामक सुधारणा या संबंधित विविध विषयांवर चर्चा झाली.प्रसंगी वॉटर रिसोर्स कमिटीचे अध्यक्ष राजीव प्रताप रूडी, समितीमधील खासदार सदस्यांसह तमिळनाडूतील संबंधित विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

आंध्रप्रदेश भाजपच्या अध्यक्षा श्रीमती खा.डी.पुरंदरेश्वरी यांनी खा.धैर्यशील मोहिते-पाटील यांचा  वाॅटर रिसोर्स कमिटीचे अध्यक्ष राजीव प्रताप रूडी यांचे उपस्थितीमध्ये सन्मान केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या