रत्नत्रय मध्ये फळ वाटपाचा स्तुत्य उपक्रम
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 12 जानेवारी 2025 :
मांडवे येथील रत्नत्रय शैक्षणिक संकुलात फळवाटपाचा स्तुत्य उपक्रम प्रत्येक शनिवारी राबविला जातो. त्यामुळे लहान मुलांस नियमित फळांचे सेवन केल्याने पचनशक्ती वाढते, त्याचबरोबर लहान मुलांमध्ये फळे खाण्याची आवड निर्माण होते. त्याचप्रमाणे आमच्या संस्थेचा हा उपक्रम घेण्यामागचा प्रमुख हेतू म्हणजे मुलांमध्ये असणारे कला गुण दर्शविण्याची त्यांना संधी उपलब्ध करून देणे. मुलांमध्ये स्टेज डेरिंग निर्माण करणे हा आहे.
या दरम्यान मुलांच्या विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम, प्रश्नमंजुषा कार्यक्रम घेण्यात आला. सदर प्रसंगी संस्थापक अध्यक्ष अनंतलाल दोशी , पांडुरंग राऊत, शितल देसाई, विलास ननवरे, सौ सुरेखा ननवरे, हरिदास देशमुख, मल्हारी भुजबळ, श्री बाळासाहेब शिंगाडे, बबन गोफणे, दिनेश राऊत, संतोष वाघमोडे, शुभम किरवे, गणेश किरवे, सौ स्नेहा ढगे, सौ वेदिका धाईंजे, संदीप धाईंजे उपस्थितीत हा उपक्रम राबविला गेला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ स्वाती दुधाळ यांनी केले.फळवाटप दातार: पांडुरंग राऊत व शितल देसाई नातेपुते
0 टिप्पण्या