तडीपार गृहमंत्री शहांनी अख्खी काॅंग्रेस दहा वर्षे तडीपार केली

 

तडीपार गृहमंत्री शहांनी अख्खी काॅंग्रेस दहा वर्षे तडीपार केली 

 वृत्त एकसत्ता न्यूज

संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे

मुंबई दिनांक 19 जानेवारी 2025 :

शिल्लक राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवारसाहेब यांनी आता काही केल्या लवकरात लवकर राष्ट्रीय अर्थात दोन अडीच जिल्ह्याच्या राजकारणातून कायमचे तडीपार व्हावे म्हणजेच सेवानिवृत्त झाले तर अधिक बरे होईल कारण यापुढे राष्ट्रवादी काँग्रेस सोडा पण त्यांची काॅंग्रेसप्रणित इंडिया नामक आघाडी किमान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राजकीय हयातीत पुढील पंचवीस वर्षे केंद्रात सत्तेवर येण्याची सुतराम शक्यता नाही , अर्थात या राजकीय भुकंपाची सर्वात पहिली चाहूल शिल्लक राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवारसाहेब यांना लागली असल्यामुळे त्यांनी आजपर्यंत देशाने अनेक केंद्रीय गृहमंत्री पाहिले पण अमित शहा यांच्या सारखा तडीपार गृहमंत्री पाहिला नसल्याची मुक्ताफळे उधळत अजूनही मी राष्ट्रीय राजकारणात सक्रिय असल्याचा काॅंग्रेसच्या हायकमांडला इशारा दिला असला तरी याच हायकमांडने दस्तूरखुद्द शरदचंद्र पवारसाहेब यांनाच काॅंग्रेसच्या कळपातून पंचवीस वर्षांपूर्वी कायमचे केवळ हाकलून दिले नव्हते तर तडीपार केले होते , याची बोच साहेबांना अजूनही सलत आहे म्हणून त्यांच्या शब्दकोशातून अकस्मातपणे विश्व प्रवक्ते खासदार संजय राऊत यांचे सडके विचार डोकावले असतील तर त्यात काही नवल नाही .

    ' ढवळ्या शेजारी पोहळा ' बांधला की दुसरं काय घडणार नाही का ॽ कारण मागील दहा वर्षांपासूनच्या सततच्या संगतीमुळे शरदचंद्र पवारसाहेब यांना विश्व प्रवक्ते खासदार संजय राऊत यांची वात्रट टिका टिप्पणी करण्याचा गुण लागला तर त्यात काय वावगं ठरणार नाही , अतिरेकी सोहराबुद्दीनच्या गुजरात राज्यातील एन्काऊंटर प्रकरणी तेंव्हाचे त्या राज्याचे गृहमंत्री राज्यमंत्री अमित शहा यांना या खटल्यातील तपास योग्य दिशेने व्हायला हवा म्हणून त्यांना दोन वर्षांसाठी गुजरात राज्यात वास्तव्य करू नये असा फतवा तेथील न्यायालयाने काढला होता त्यामुळे ते काही काळ दिल्लीत माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांच्या निवासस्थानी भाजपला केंद्रात सत्तेवर आणण्याची योजना आखत होते , आणि तीच योजना अमित शहा यांना भाजपचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष व विद्यमान रक्षा मंत्री राजनाथसिंह        यांनी राष्ट्रीय सरचिटणीस पदाचा कारभार सोपवत त्यांच्यावर उत्तर प्रदेश सारख्या मोठ्या राज्याचे दहा वर्षापूर्वी प्रभारी केले .

       याचा परिणाम असा झाला की उत्तर प्रदेशातील ऐंशी लोकसभा जागांपैकी विरोधकांना केवळ नऊ जागांवर कसाबसा निसटता विजय मिळवता आला तर ही त्यावेळच्या तडीपार माजी गृहराज्यमंत्री अमित शहा यांची दमदार कामगिरी , याची सल आजही शरदचंद्र पवारसाहेब यांच्या जिव्हारी लागलेली आहे कारण त्यानंतर मागील दहा वर्षात सध्याची इंडिया नामक आघाडी केंद्रातील सत्तेच्या आसपास सुध्दा शोधून देखील सापडत नाही , मधल्या काळात सर्वोच्च न्यायालयाने अमित शहा यांना सोहराबुद्दीन एन्काऊंटर प्रकरणातून जसे दोषमुक्त केले तेंव्हा पासून शहांचा वारू इंडिया नामक आघाडीची सर्वदूर दाणादाण उडवत आहे हे पवारसाहेबांच्या केवळ पचनी पडत नाही , तर पुढील पंचवीस वर्षे तरी इंडिया नामक आघाडी जर अस्तीत्वात राहिली तरीसुद्धा भाजप केंद्रीय सत्तेच्या बाकावरून किंचित सुध्दा मागे हटणार नाही .

      अहो पवारसाहेब तुम्ही देशाचे पंतप्रधान व्हायला दिल्लीवर स्वारी करून गेला होता त्याला तब्बल तेहतीस वर्षांचा कालावधी कधीच उलटून गेला पण तुमची स्वारी हळूहळू आता अडखळत अडखळत आताच्या लोकसभा निवडणुकीत केवळ आठ खासदारांचा तर विधानसभा निवडणुकीत केवळ आणि केवळ कसाबसा दहा आमदारांचा टप्पा गाठू शकली , याचा अर्थ मतदारांनी तुमच्यासह तुमच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुरत्या राई राई करत अशा काही चिंधड्या केल्या आहेत की तुम्हाला या वाढत्या थंडीत त्याची साधी वाकळ देखील शिवता येईना त्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा जसा करिष्मा कारणीभूत आहे तसा तुमचा निष्काळजीपणा देखील कारणीभूत आहे , त्यामुळे सत्तेच्या खुर्चीवर बसून ' याला पाडा त्याला पाडा ' याच सारं गणितच मतदारांनी मुसळाच्या केरात कधीच टाकून दिले आहे .

      पण तुमचा राजकीय सुर्यास्त होतोय हे काही केल्या तुम्हाला अजूनही कळत नाही किंवा कळून सुद्धा वळत नाही कारण तुमच्याकडे चाकरी करणाऱ्या विश्व प्रवक्ते खासदार संजय राऊत यांच्यासह अनेक पत्रकारांची काही कमी नाही म्हणून तुमचा सत्तेचा माज ' सुंभ जळला तरी काही केल्या पीळ जात नाही ' अशा चक्रात अडकून पडला आहे त्याला बिचारे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तरी काय करणार कारण तुमचा उल्हास आणि त्यात डाव्यांचा फाल्गुन मास असल्यावर दुसरे काही घडू शकते का ॽ त्यात तुमच्या सततच्या उचापतखोरीचा स्वभाव काॅंग्रेस हायकमांडने पंचवीस वर्षांपूर्वीच चांगलाच ओळखला आहे त्यामुळे तुम्हाला पक्षातून कायमचे तडीपार करण्यात आले , तरीही सत्तेसाठी तुमच्या हातात कटोरा आहे त्यामुळे उगाच ' वडाची साल पिंपळाला लावून ' आपली उरलीसुरली औकात घालवू नका कारण तुमचा राजकीय रुबाब आता पुर्वीचा राहिलेला नाही , असो जमलं तर घ्या मनावर दुसरं काय ! अर्थात मी काय तुमच्या राजकारणाला उपदेश देण्यापर्यंत अजिबात मोठा नाही पण ज्यावेळी अमित शहा यांच्या भट्टीत हात घालता तेंव्हा काही प्रमाणात हाताला चटके सहन करावे लागतात नाही का ॽ 

राजाभाऊ त्रिगुणे ,सातारा.

पत्रकार, जेष्ठ राजकीय विश्लेषक

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या