रत्नत्रय मध्ये फळ वाटपाचा स्तुत्य उपक्रम

 


रत्नत्रय मध्ये फळ वाटपाचा स्तुत्य उपक्रम

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे

मुंबई दिनांक 4 जानेवारी 2025 :  मांडवे (तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर) येथील रत्नत्रय शैक्षणिक संकुलात फळवाटपाचा स्तुत्य उपक्रम प्रत्येक शनिवारी राबविला जातो.  लहान मुलांना   लहापणापासूनच फळे खाण्याची सवय लागावी यासाठी हा स्तुत्य उपक्रम प्रत्येक शनिवारी शाळेमध्ये घेण्यात येतो. नियमित फळांचे सेवन केल्याने पचनशक्ती वाढते,🍓🍓🍊🍋🍎🍈🍒🍑 त्याचबरोबर लहान मुलांमध्ये फळे खाण्याची आवड निर्माण होते.

शनिवार दि. 4 जानेवारी 2025 रोजी सदर प्रसंगी सहदेव बबन खोमणे, दिनेश जाधव ,सौ. गीतांजली लवटे,  सौ .जुलेखा शेख, सौ .शिवानी गोसावी, सौ.कोमल जाधव, शिक्षक ,शिक्षकेत्तर  कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.  मुख्याध्यापक दैवत वाघमोडे  यांच्या उपस्थितीत हा उपक्रम राबविला गेला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ . दिपाली राऊत  यांनी केले. आजच्या कार्यक्रमाचे फळ वाटप दातार- रत्नत्रय इंग्लिश मीडियम स्कूल मांडवे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या