सहकार महर्षि अभियंत्रिकी महाविद्यालया मध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 4 जानेवारी 2025 :
अकलूज (तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर) येथील सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च, शंकरनगर-अकलूज या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. त्यावेळी सिने अभिनेता अशोक शिंदे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण ढवळे, कार्यालयीन अधीक्षक शब्बीर शेख, सर्व विभागाचे विभाग प्रमुख, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन सिनेअभिनेता अशोक शिंदे यांच्या हस्ते झाले. त्यानंतर त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन चरित्राविषयी बोलताना सांगितले कि सावित्रीबाई फुले या पहिल्या महिला शिक्षिका होत्या. महिलांच्या शिक्षणासाठी त्यांचा फार मोठा त्याग व मोलाचा वाटा आहे. आज त्यांच्यामुळेच महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावुन काम करत आहेत.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण ढवळे यांनी कार्यक्रमाचे प्रस्तावविक केले व सर्वांना सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तसेच आभार प्रदर्शन प्रा. सचिन पांढरे यांनी केले.
0 टिप्पण्या