मोहन मुरलीधर भांडवलकर समाज भूषण पुरस्काराने सन्मानित
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 7 जानेवारी 2025 :
श्री सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट करंजे चे विश्वस्त आणि वारकरी सेवा संघ बारामती तालुका उपाध्यक्ष मोहन मुरलीधर भांडवलकर यांना "समाजभूषण" पुरस्कार मिळाल्याबद्दल बारामती येथे वारकरी सेवा संघ बारामती तालुका कार्यकारिणी पदाधिकारी यांचे वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
देहु संस्थान चे अध्यक्ष ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज मोरे, पालखी सोहळा प्रमुख ह.भ.प.माणिक महाराज मोरे, तसेच त्र्यंबकेश्वर,संत निवृत्तीनाथ संस्थान चे ह.भ.प. संजयनाना धोंडगे महाराज व बारामती तालुका मार्गदर्शक राजेंद्र सोळस्कर, माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब बारवकर दत्तात्रय गावडे ,सचीव दत्तात्रेय भोसले, संपर्कप्रमुख निखील कदम, माजी जिल्हा कार्यकारिणी सदस्य वासुदेव फलके, सदस्य विकास होले, ज्ञानेश्वर गावडे इत्यादी मान्यवरांनी याप्रसंगी उपस्थित राहून यथोचित सत्कार करून भांडवलकर यांना शुभेच्छा दिल्या.
नॅशनल युनियन बॅकवर्ड एससी एसटी अँड मायनॉरिटी महासंघ दिल्ली आणि शरद जोशी विचार मंच शेतकरी संघटना महासंघ, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष, संपर्कप्रमुख व प्रसिद्धीप्रमुख पत्रकार भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे यांनी मोहन मुरलीधर भांडवलकर यांना "समाजभूषण" पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन करून शुभेच्छा व्यक्त केल्या.
0 टिप्पण्या