💢 पुणे जिल्ह्यातील ऊसतोडणी युवक शेतकऱ्यांना वाल्मीक कराड -मुंडे टोळीकडून २.८० कोटीचा गंडा.! 🟪 *"अन् दाद मागायला गेलेल्या शेतकऱ्यांना 'दादा, म्हणे इंथ कश्याला आला".?

💢 पुणे जिल्ह्यातील ऊसतोडणी युवक शेतकऱ्यांना वाल्मीक कराड -मुंडे टोळीकडून २.८० कोटीचा गंडा.!

🟪 *"अन् दाद मागायला गेलेल्या शेतकऱ्यांना 'दादा, म्हणे इंथ कश्याला आला".?

वृत्त एकसत्ता न्यूज

आकाश भाग्यवंत नायकुडे

मुंबई दिनांक 22 जानेवारी 2025 : "बारामती तालुक्यासह  पुणे जिल्ह्यातील ३६ युवकांकडून कराड- मुंडे टोळीने प्रत्येकी ०८ लाख वसूल केले, या प्रकरणी २१ जानेवारी २०२५ रोजी फसवणूक झालेल्या युवकांनी संघटनेचे अध्यक्ष विठ्ठल राजे पवार यांच्याशी चर्चा केली व न्याय मागितला. नुकत्याच झालेल्या नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये काही लोक उपमुख्यमंत्री यांच्याकडे वाल्मीक कराड मुंडे टोळी विरोधात दाद मागण्याची गेले असता, "दादा म्हणाले इथं कशाला आला".? त्यामुळे बारामती तालुक्यात चर्चेचा विषय होऊन शेतकरी युवकांमध्ये पुणे जिल्ह्यात प्रचंड नाराजीचा सूर उमटत आहे. असे शरद जोशी विचार मंच शेतकरी संघटना महासंघ चे अध्यक्ष व राष्ट्रीय निमंत्रक विठ्ठल राजे पवार (माजी सदस्य ऊस नियंत्रण मंडळ महाराष्ट्र राज्य) यांनी सांगितले.

 महाराष्ट्र राज्यातल्या १४३ ऊस हार्वेस्टर तोडणी यंत्र शेतकऱ्यांना वाल्मीक कराड, तत्कालीन कृषी मंत्री व, साखर आयुक्त यांच्या टोळीने ११.८८ कोटींना चक्क साखर आयुक्तालय व सहकार्यातल्या टोळीच्या सहकार्याने गंड घातला आणि तक्रार करणाऱ्यांना वाल्मीक कराड टोळी विरुद्ध बोलल्यास विरोधामध्ये करार केल्यास ऊस तोडणी यंत्र युवकांना मारहाण किंवा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. हे सर्व प्रकार मुंबई सह्याद्री अतिथीगृह, परळी मधील हॉटेल, वाल्मीक कराडचा बंगला आणि तत्कालीन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या परळी मध्ये बोलवून गुंडांकडून संबंधित शेतकऱ्यांना जबर धमकी देण्यात आली ही बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची आहे. तसेच गेल्या सहा सात वर्षांमध्ये राज्याच्या साखर आयुक्तालयाच्या मदतीने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना तोडणी वाहतूक, एफआरपी, वजन काटा, आणि रिकवरी मध्ये २२ हजार कोटी रुपयांहून अधिकचे शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान तत्कालीन साखर आयुक्त व संबंधित संस्थांच्या मदतीने केले गेले आहे.

 इंदापूर साखर कारखान्याने ४६००० हजार कोटी साखर विकली २०१५ ते १८ पर्यंत दिलेले चौकशीचा अद्याप आरजेडी नांदेड यांनी रिपोर्ट सादर केला नाही.? साखर आयुक्त संबंधितांवर दप्तर दिरंगाई, कर्तव्यात कसूर, नागरिकाची सनद पालन करणे, शेतकरी व शेतकरी यंत्रधारक युवकांशी अशासकीय भाषा, गैर शब्द वापर, परळी , मुंबईला बोलावून गुंडांकडून शेतकरी युवकांना मारण करणे, धमकी देणे, याप्रकरणी शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटना महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा निमंत्रक तसेच ऊस नियंत्रण मंडळ महाराष्ट्र राज्याचे माजी सदस्य विठ्ठल राजे पवार यांनी गंभीर दखल घेत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांची समक्ष भेट घेऊन गुन्हे दाखल करण्याच्या संदर्भात विनंती करणार असल्याचे सांगितले. राजे पवार म्हणाले गेल्या सात-आठ वर्षांपासून साखर आयुक्तालय व विभागीय साखर विभागामध्ये शेखर गायकवाड यांच्या माध्यमातून अधिकाऱ्यांकडून अर्थिक गुंडगिरी, यामध्ये शेखर गायकवाड तत्कालीन साखर आयुक्तांसह पाच ते सहा अधिकाऱ्यांवर २२ हजार कोटीहून अधिक रुपयाच्या केलेल्या अपरातफर, अनियमितता प्रकरणी गुन्हे दाखल करावेत., बाबत विठ्ठल राजे पवार यांनी मागे लेखी स्वरूपात केलेले गंभीर आरोप तंतोतंत खरे ठरतात, असे संघटनेच्या वतीने म्हटले आहे, ऊस तोडणी यंत्रात शेखर गायकवाड यांच्या मदतीने झालेल्या आर्थिक गैरव्यवहार, अनियमितता, दलाली, मनी लॕड्रींग प्रकरणी दोन-तीन दिवसात शरदजोशी विचारमंच शेतकरी संघटना महासंघ महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्या प्रकरणी न्यायालयात तक्रार दाखल करणार असल्याची माहिती संघटनेच्या सोलापूर जिल्हा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा कांचन जंगले, सोलापूर जिल्हा अध्यक्ष व पंढरपूर तालुकाध्यक्ष यांनी म्हटले आहे.

गेल्या सहा ते सात वर्षात तत्कालीन साखर आयुक्तालयाकडून २२ हजार कोटीचा एफआरपी घोटाळा, साखर आयुक्तालयाच्या सुशोभीकरणावर कोट्यावधी रुपये उधळपट्टी.


*मुंबई;- यावेळी संघटनेचे पुणे शहर जिल्हा युवक अध्यक्ष अनिल भांडवलकर यांनी सांगितले की महाराष्ट्र राज्यातल्या ऊस तोडणी वाहतूक एफआरपी वजन काटे तसेच उपपदार्थ रिकवरी मध्ये झालेल्या 22 हजार कोटी रुपयांच्या आर्थिक अनियमितता व घोटाळ्यासंदर्भामध्ये विठ्ठल राजे पवार यांनी  तत्कालीन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सहकार मंत्री यांना सह्याद्री अतिथीगृह येथे तर माननीय मुख्य सचिव तथा अध्यक्ष ऊस नियंत्रण मंडळ महाराष्ट्र राज्य यांना मंत्रालयात भेटून सविस्तर माहिती व निवेदना सोबत पुरावे दिलेले आहेत, परंतु या प्रकरणी सदरचे भ्रष्टाचाराचे प्रकरण दाबले गेलेले आहे. याप्रकरणी संघटना न्यायालयात गेली आहे. पोलिसात गुन्हे दाखल केलेले आहेत. परंतु पोलिसांनी देखील सविस्तरपणे गुन्हे दाखल करून घेतलेले नाहीत म्हणून संघटना न्यायालयामध्ये जुन्या आयएफसी अॕक्ट १५६/३ अन्वये न्यायालयात दाद मागणार आहे. अशी माहिती पुणे शहर जिल्हा युवक अध्यक्ष अनिल भांडवलकर यांनी दिली आहे.

भ्रष्टाचार बाहेर काढल्याने चिडून शेखर गायकवाड यांनी विठ्ठल राजे पवार यांना धमकी दिली.!

शेतकरी संघटनेचे निवेदन स्वीकारू नयेत व त्यांना दाद देऊ नये तत्कालीन साखर आयुक्त शेखर गायकवाड यांचे आयुक्तालयातील साखर संचालक, तसेच राजेश सुरवसे, यशवंत गिरी, म़गेश तिटकारे, पांडुरंग शेळके, साखर सह संचालक श्रीमती गायकवाड तसेच विभागीय सहनिबंधक साखर सर्व यांना मीटिंग घेऊन सांगितले होते. त्यानंतर तत्कालीन प्रोमोटेड शेखर गायकवाड यांनी विठ्ठल राजे पवार यांना फोनवर धमकी दिली होती की तुम्ही आमच्या विरोधात मुख्यमंत्री सहकार मंत्री कृषी मंत्र्यांकडे तक्रार केली यापुढे आम्ही शेतकरी संघटनेची कोणतीही दखल माझे कोणते अधिकारी घेणार नाही अशा सूचना  सर्व अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत अशी भ्रमणध्वनी वरुन शेखर गायकवाड यां नी सांगितले.  या प्रकरणी विठ्ठल राजे पवार यांनी शिवाजीनगर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती, तसेच माननीय गृहमंत्री मुख्यमंत्री सर्व बाजूने पत्र व्यवहार होऊन पुरावे देऊन देखील त्या संदर्भात फोनवरचे रेकॉर्डिंग पोलिसांना दाखल करून देखील पुणे शहर पोलिसांनी तत्कालीन प्रमोटेड (उपजिल्हाधिकारी.) साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्यावर गुन्हे दाखल केलेले नाहीत.? शेखर गायकवाड यांच्या सह संबंधित आठ ते दहा जणांवर संघटित गुन्हेगारी, साखर कारखाने खाजगी सहकारी माध्यमातून शेतकऱ्याची आर्थिक लूट करणे फसवणूक करणे, संघटनेचे आदेशाला धमकी देणे प्रकरणी ३०७ /३५/४२०/४१९/साखर एमडी टेंडर मंजुरी, तोडणी यंत्र अनुदानात प्रकरणी साखर आयुक्तालयात मुंबईला वाल्मीक कराड यांच्यासोबत धनंजय मुंडे यांच्या सांगण्यावरून सुमारे १५ ते २० कोटी रुपयांची खंडणी वसूल करणे शेखर गायकवाड हा वाल्मीक कराड यांचा मित्र आहे म्हणून शेखर गायकवाड यांनी कृषी मंत्री मुंडे, वाल्मीक कराड व त्यांच्या गुंड सहकार्यांना गायकवाड यांनी अधिकाऱ्यांच्या व सचिवांच्या माध्यमातून त्यांना मदत केली. त्यामध्ये शेखर गायकवाड, अनुप कुमार यांचे खाजगी सचिव व प्रिय मित्र देखील सामील आहेत अशी माहिती  राजे पवार यांनी आज प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. तसेच मला शेखर गायकवाड वाल्मीक कराड यांचा मित्र आहे त्यामुळे माझ्यावर कुटुंब यांच्या जीवितला धोका असल्याची तक्रार विठ्ठल राजे पवार यांनी केलेली आहे, म्हणून शेखर गायकवाड यांनी धमकी दिल्या प्रकरणी त्यांचेवर संघटित गुन्हेगारी प्रकरणी गुन्हे दाखल करावेत, तसेच शेखर गायकवाड व त्यांच्या सारे टीम आणि अनुप कुमार यांनी आर्थिक संपत्तीत उत्पन्नाच्या स्त्रोतापेक्षा प्रचंड वाढ भ्रष्ट मार्गाने केलेली असल्याने त्यांच्या संपत्तीची चौकशी व्हावी अशी मागणी राज्याचे तत्कालीन व विद्यमान मुख्यमंत्री गृहमंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्य सचिव व पोलीस महासंचालक यांच्याकडे लिखित स्वरूपात केली आहे, मात्र पुणे पोलिसांनी अद्यापही गुन्हा दाखल केलेले नाही मात्र सर्व पुरावे दाखल केलेले आहेत आता न्यायालयात जाण्या साठी संघटना दोन-चार दिवसांमध्ये निर्णय घेईल तोपर्यंत तत्कालीन साखर आयुक्त यांच्यावर गुन्हे दाखल नाही झाले तर त्यांच्या विरोधात देखील न्यायालयात जाण्यासाठी संघटनेने तयारी केलेली आहे. मुख्यमंत्री, हे परदेशातून आल्यानंतर प्रत्यक्ष भेट घेऊन तक्रार दाखल करण्याचा संदर्भात निर्णय घेऊ असे विठ्ठल राजे पवार यांनी म्हटले आहे.


ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफ आर पी, वजन काटा, रिकवरी, तोडणी वाहतुकीमध्ये, बेकादेशीर गाळप हंगाम घेणे, ४६००० हजार साखर पोती विकणे यामध्ये कोट्यावधी रुपयाचा घोटाळा झाल्याचे मुंबई मंत्रालय येथे तत्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री समक्ष भेटून निवेदन देऊन, अर्थिक घोटाळ्यातील प्रकार समजून सांगताना विठ्ठल राजे पवार यावेळी अनिल अनिल भांडवलकर, प्रकाश पोरवाल उपस्थित होते, या प्रकरणानंतर शेखर गायकवाड यांनी विठ्ठल राजे पवार यांना फोनवरून धमकी दिली होती, तशी लेखी तक्रार राजे पवार यांनी संबंधितांकडे व पोलिसांकडे केली आहे. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या