ग्रीन फिंगर्स महाविद्यालयांमध्ये वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रम संपन्न
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 13 जानेवारी 2025 : ग्रीन फिंगर्स कॉलेज ऑफ कम्प्युटर अँड टेक्नॉलॉजी अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या वतीने महाविद्यालयामध्ये वाचन संकल्प योजना ही महाराष्ट्र शासनाने विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी सुरू केलेली एक योजना आहे. या उपक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . सुभाष शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले या योजनेद्वारे विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या पुस्तकांचे वाचन करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते.
शिक्षण खात्याच्या अंतर्गत योजना राबवली जाते आणि शाळांमध्ये महाविद्यालयांमध्ये वाचन संस्कृतीला चालना देण्याच्या उद्दिष्टाने हा उपक्रम राबवला जात आहे. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात वाढ करणे विविध साहित्य प्रकाराची ओळख करून देणे व महाविद्यालयामध्ये वाचण्यासाठी पोषक वातावरण तयार करणे हा प्रमुख उद्दिष्ट ठेवून महाविद्यालयामध्ये या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमामध्ये बीसीए व बीएससी मधील अनेक विद्यार्थ्यांनी उत्साह पूर्ण सहभाग नोंदवून महाविद्यालयाच्या ग्रंथालयामध्ये वाचन केले.
या उपक्रमाप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुभाष शिंदे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना वाचनाचे अनेक फायदे समजून सांगितले. विद्यार्थ्यांनी व इतर व्यक्तीने देखील वाचनाची गोडी असावी भाषा कौशल्य आणि शब्दसंग्रह देखील वाढतो . कल्पनाशक्ती एकाग्रता , तर्कशक्ती , विकसित होते व अनेक प्रकारचे साहित्य आपल्याला माहिती होते .
या उपक्रमामध्ये महाविद्यालयातील प्राध्यापकांनी देखील सहभाग नोंदवला होता या उपक्रमामुळे वाचन ही विद्यार्थ्यांची सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाची सवय आहे वाचन संकल्प योजना विद्यार्थ्यांना सर्जनशील आत्मविश्वासू आणि साक्षर बनवण्यासाठी एक प्रभावी पाऊल आहे असे मत महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी व्यक्त केले.
0 टिप्पण्या