ओंकार साखर कारखाना चांदापुरी ङिसेंबर अखेर पर्यंत ची ऊस बीले शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा

ओंकार साखर कारखाना चांदापुरी

ङिसेंबर अखेर पर्यंत ची ऊस बीले शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा 

वृत्त एकसत्ता न्यूज

आकाश भाग्यवंत नायकुडे

निमगाव प्रतिनिधी /मुंबई दिनांक 10 जानेवारी 2025 :  

ओंकार साखर कारखाना चांदापुरी (तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर) ने 2024 - 2025 या सिझन मध्ये ङिसेंबर अखेर पर्यंत गाळपास आलेल्या ऊसाची बीले  2800/- रूपये प्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली असल्याची माहिती संचालक प्रकाशराव बोत्रे- पाटील यांनी दैनिक अचूक निदान, साप्ताहिक अकलूज वैभव, पाक्षिक वृत्त एकसत्ता ला दिली.

ओंकार साखर कारखाना परिवाराचे चेअरमन बाबुराव बोत्रे-पाटील यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना शब्द दिला होता की, "शेतकऱ्यांची ऊस  बीले वेळेत खात्यावर जमा होतील" त्यानुसार ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे पैसे वेळेच्या आगोदरच शेतकऱ्यांच्या खात्यावर  वर्ग झाले आहेत. ओंकार साखर कारखाना परिवारच्या सर्व युनिट मध्ये वजन काट्याबाबत पारदर्शकता आहे. ओंकार साखर कारखान्याचे चेअरमन बाबुराव बोत्रे-पाटील, संचालिका रेखाताई बोत्रे-पाटील, संचालक प्रशांतराव बोत्रे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उर्वरीत कालावधीत जास्तीत ऊसाचे  गाळप करण्याचा कारखान्याचा मानस आहे. तरी ऊसउत्पादन शेतकऱ्यांनी आपला ऊस "ओंकार" ला घालावा" असे आवाहन जनरल मॅनेजर भिमराव वाघमोडे, केन आधिकारी शरद देवकर यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या