💢 "सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील साहित्य पुरस्कार" जाहीर

🟧 श्री विजय गणेशोत्सव मंडळ पब्लिक ट्रस्ट शंकरनगर अकलूज साहित्य क्षेत्रासाठीचा स्तुत्य उपक्रम

🔰 विशेष साहित्यिक पुरस्कार  कादंबरीकार विश्वास पाटील यांना  तर साहित्यिक पुरस्कार एक- आप्पासाहेब खोत आणि साहित्यिक पुरस्कार- दोन इतिहासकार गोपाळराव देशमुख यांना जाहीर 

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे

मुंबई दिनांक 5 जानेवारी 2025 : माजी  उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या अध्यक्षते खाली आज संपन्न झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये साहित्य क्षेत्रात मानाचा पुरस्कार म्हणून नावारूपास आलेला  "सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आला.

यावर्षीचा विशेष साहित्यिक पुरस्कार  कादंबरीकार विश्वास पाटील यांना  तर साहित्यिक पुरस्कार एक- आप्पासाहेब खोत आणि साहित्यिक पुरस्कार- दोन इतिहासकार गोपाळराव देशमुख यांना जाहीर झाला. 

तसेच यावर्षी नव्याने माळशिरस तालुक्यातील साहित्यिक पुरस्कार चरित्र ग्रंथ लेखक प्रमोद जोशी यांना जाहीर करण्यात आला.

आपल्या सिद्धस्थ लेखणीने सामाजिक वैचारिक सांस्कृतिक कथा कविता ललित ऐतिहासिक चरित्र आत्मचरित्र इत्यादी साहित्य प्रकारांमध्ये अमुलाग्र योगदान देऊन समाज प्रबोधन करणाऱ्या साहित्यिकांचा सन्मान करणे करिता तसेच माळशिरस तालुका व जिल्ह्यातील साहित्यिक चळवळीला चालना देऊन नवनवीन साहित्य प्रकाशात यावे याकरिता श्री विजय गणेशोत्सव मंडळ पब्लिक ट्रस्ट शंकरनगर अकलूज (तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर )यांचे वतीने सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील साहित्य पुरस्कार वितरण सोहळा सन 2023 पासून सुरू करण्यात आलेला आहे असेही या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. 

श्री विजय गणेशोत्सव मंडळ पब्लिक ट्रस्ट शंकरनगर अकलूज यांच्या वतीने सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील साहित्य पुरस्कार 2025 चा वितरण सोहळा माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे  हस्ते सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती अकलूज चे सभापती मदनसिंह मोहिते पाटील, आमदार रणजितसिंह  मोहिते पाटील, खासदार धैर्यशिल मोहिते पाटील यांचे प्रमुख उपस्थितीत बुधवार दिनांक 15 जानेवारी 2025 रोजी सकाळी 10:30 वाजता सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील सहकारी कारखाना प्रशासकीय कार्यालयातील उदय सभागृह येथे संपन्न होणार आहे. 

प्रथम वर्षी सन 2023 मध्ये विशेष साहित्य पुरस्कार अच्युत गोडबोले, मुंबई यांना तर ललित साहित्य कृती पुरस्कार डॉक्टर यशवंत पाटणे, सातारा व कविता साहित्य कृती पुरस्कार डॉक्टर राजेंद्र दास, कुर्डूवाडी यांना देऊन सन्मानित करण्यात आले होते. तर सन 2024 मध्ये विशेष साहित्य पुरस्कार इंद्रजीत भालेराव यांना व साहित्यिक पुरस्कार डॉक्टर सुवर्ण लता निंबाळकर यांना देण्यात आले होते.

अशी माहिती या पत्रकार परिषदेमध्ये देण्यात येऊन सर्व साहित्य प्रेमी, वाचक, लेखक, कवी यांनी सदर पुरस्कार वितरण समारंभास उपस्थित रहावे असे आवाहन प्रसिद्धी माध्यमांच्या द्वारे करण्यात आले. यावेळी ट्रस्टी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या