वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 17 जानेवारी 2025 : २३ ते २६ जानेवारी २०२५ या कालावधी मध्ये सकाळी १० ते सायंकाळी आठ वाजेपर्यंत गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट, पुणे येथे बांबू सोसायटी ऑफ इंडिया, महाराष्ट्र चॅप्टरच्या पुढाकाराने पुणे बांबू फेस्टिव्हल 2025 चे आयोजन केले असल्याची माहिती अनुराधा काशिद (कार्यकारणी सदस्य, बांबू सोसायटी ऑफ इंडिया - महा. चॅप्टर) यांनी साप्ताहिक अकलूज वैभव आणि पाक्षिक वृत्त एकसत्ता ला सांगितली.
बांबूला 'कल्पतृण' म्हणतात, कारण त्याचा एकही भाग वाया जात नाही. जगातील सर्वात वेगाने वाढणारे हे गवत सौंदर्य, उपयोगिता आणि टिकाऊपणाचे प्रतीक आहे. बांधकाम, हस्तकला, दैनंदिन साहित्य, खाद्यपदार्थ आणि पर्यावरण संवर्धन या प्रत्येक क्षेत्रात बांबूचा अनोखा ठसा आहे. टिकाऊ भविष्याची उभारणी करताना बांबू एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो.
पुणे बांबू फेस्टिव्हल २०२५ आपल्यासाठी एक अनोखा अनुभव घेऊन येत आहे! हा महोत्सव बांबूच्या सौंदर्याचा, उपयुक्ततेचा आणि बहुउपयोगी शक्यतांचा उत्सव आहे. बांबूशी संबंधित कला, हस्तकला, उत्पादने, बांधकाम, व टिकाऊ जीवनशैली यांचा समृद्ध खजिना येथे अनुभवायला मिळेल.
याठिकाणी काय खास आहे?
बांबू बांधकाम व डिझाइन बांबूचा उपयोग करून तयार केलेली वास्तूशिल्पे पाहण्याची संधी. हस्तकला प्रदर्शन: बांबू हस्तकला आणि कलाकृतींनी परिपूर्ण स्टॉल्स. उत्पादन विक्री : बांबूपासून बनवलेली अनोखी उत्पादने, बांबू लागवड व प्रक्रिया माहिती : बांबू शेती आणि त्यावर आधारित उद्योग यांची माहिती सत्रे,बांबू मशिनरी बांबू उद्योग स्थापन करण्यासाठी लागणाऱ्या सामग्री व मशिनरी, महिला व युवक सक्षमीकरणासाठी मार्गदर्शन बांबूपासून उद्योजकता निर्माण करण्याच्या शक्यतांची ओळख. बांबूच्या माध्यमातून टिकाऊ विकासाची वाटचाल आणि भविष्यातील संधींचा विचार करण्यासाठी हा महोत्सव एक महत्त्वाचे व्यासपीठ ठरेल! अशी आशा या बांबू महोत्सवातून दृढ होईल.
अधिक माहितीसाठी अनुराधा काशिद कार्यकारणी सदस्य बांबू सोसायटी ऑफ इंडिया - महा. चॅप्टर 📞 9158197646 | 9421789088 येथे संपर्क साधावा.


0 टिप्पण्या