आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित निबंधलेखन स्पर्धेत अश्विनी पाटील प्रथम तर धनश्री पाटील यांचा द्वितीय क्रमांक

 

आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित निबंधलेखन स्पर्धेत   अश्विनी पाटील प्रथम तर धनश्री पाटील यांचा द्वितीय क्रमांक 

वृत्त एकसत्ता न्यूज 

कोडोली ( ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर )/ दिनांक :६:      भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरट यांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त आयोजित निबंधलेखन स्पर्धेत अश्विनी शामराव पाटील यांनी प्रथम क्रमांक पटकावला. येथील यशवंत शिक्षणशास्त्र महाविद्यालयात' सृजनशीलता आणि  व्यक्तिमत्त्व विकास विभाग ' आणि नॅक  विभागाच्या  संयुक्त  विद्यमाने  निबंधलेखन स्पर्धेचे आयोजन केले होते.

    या स्पर्धेत महाविद्यालयातील प्रथम वर्ष वर्गातील अश्विनी पाटील यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्याचप्रमाणे द्वितीय वर्षातील धनश्री पोपट पाटील आणि अमृता जगन्नाथ पाटील यांनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला.

प्राचार्य डॉ. विश्वनाथ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले. डॉ. आंबेडकरांना जातियवाद , धर्मवाद मुळीच मान्य नव्हता., पण नंतरच्या राजकीय मंडळींनी राजकीय स्वार्थापोटी  जातियवाद , धर्मवाद  यांना खतपाणी घातल्याची खंत प्राचार्य डॉ. पाटील यांनी व्यक्त केली. याप्रसंगी वर्गप्रतिनिधी मोनिका पाटील, सौरभ झेंडे आणि अश्विनी शामराव पाटील यांची डॉ. बाबासाहेबांचा जीवनपट उलगडणारी भाषणे झाली.

    प्रा. संजय जाधव यांनी प्रास्तविक केले.  अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे प्रमुख  प्रा. एस. डी. रक्ताडे यांनी आभार मानले. याप्रसंगी कार्यालयीन अधीक्षक एस. के. पाटील, वरिष्ठ लिपिक अनिल इंदुलकर , सेवक तानाजी मोहिते यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या