💢 वैधमापन शास्र पुणे विभागा द्वारे अचानक "श्री शंकर" च्या ऊस वजन काट्याची तपासणी 🟩 ऊसाचे वजन काटे अचूक असल्याचा अहवाल

 💢 वैधमापन शास्र पुणे विभागा द्वारे अचानक   "श्री शंकर" च्या ऊस वजन काट्याची तपासणी

🟩 ऊसाचे वजन काटे अचूक असल्याचा अहवाल 

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे

मुंबई दिनांक 06/12/2024 : सोलापूर जिल्ह्याच्या माळशिरस तालुक्यातील श्री शंकर सहकारी साखर कारखाना लि. सदाशिवनगर येथे ६ डिसेंबर २०२४ रोजी  वैधमापन शास्र पुणे विभागातील अधिकाऱ्यांनी अचानकपणे ऊसाचे वजन काटे चेक केले. सदरील वजन काट्याची तपासणी करताना वाहन मालक व कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 

सदरील तपासणी पथकाने  ऊसाचे वजन काटे चेक केले असता त्यात कोणतीही तफावत त्यांना आढळून आलेली नाही. कारखान्याचे ऊसाचे वजन काटे अचूक असल्याचा त्यांनी अहवाल दिला.

तपासणी पथका मध्ये वैधमापन पुणे येथील उप नियंत्रक, निरीक्षक व अधिकारी हजर होते. त्यांनी ऊसाचे वजन काट्याची तपासणी करून वजन काटे अचूक असल्याचे तपासणी अहवालात नमूद केले आहे. तरी सभासदांनी व ऊस उत्पादकांनी कारखान्यास जास्तीत जास्त ऊस गळीतास देऊन सहकार्य करावे असे कारखान्याच्या प्रशासनातर्फे आवाहन करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या