दत्त मंदिर माणगाव,ता.कुडाळ,
जिल्हा सिंधुदुर्ग
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 14/12/2024 :
आज दत्त जयंती.!! स्मरा स्मरा हो दत्तगुरु
दत्तगुरु भवताप हरू
अगदी लहानपणापासून तीन शिरे सहा हात असणाऱ्या या देवाबद्दल मला प्रचंड कुतूहल होतं. पण श्री दत्तात्रयांची जन्म कथा वाचल्यानंतर ते दूर झालं. दत्तात्रेयांचे जे अनेक भक्त आहेत किंवा अवतार आहेत त्यांच्यापैकी एका दत्त अवतारी सिद्ध पुरुषाबद्दल आज दत्त जयंतीच्या निमित्ताने जाणून घेण्याची व बोलण्याची संधी मला मिळालेली आहे.
योगीराज प.पु.वासुदेवानंद सरस्वती(टेंबे स्वामी) यांचे जन्मगाव म्हणजेच कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील कुडाळ तालुक्यात असणारे माणगाव. दत्तभक्त श्री गणेश शास्त्री आणि सौ.रमाबाई या ब्राह्मण दांपत्यांच्या पोटी श्रावण कृष्ण पंचमी शके १७७६ (दि.१३/०८/१८५४) रोजी माणगावी स्वामीचा जन्म झाला. ते दत्त अवतारी सिध्द पुरुष होते,कारण गणेश शास्त्रींना गाणगापुरी सद्गुरू दत्तात्रेयांनी दृष्टांन्त देऊन "मी तुझ्या कुळात जन्म घेईन" असा आशीर्वाद दिला होता.श्री टेंबे स्वामींचे आयुष्य म्हणजे केवळ दत्तात्रेयांच्या कृपेने विकसित झालेले आणि सर्वांच्या आयुष्यात सुगंध पसरविणारे ब्रह्मकमळ होय.
स्वामींजीनी पायी भारत भ्रमण करून दत्त संप्रदायाचा प्रसार केला .त्यांच्या या महान कार्याला दत्त संप्रदायात तोड नाही.त्यांना सर्व विद्या अवगत होत्या.श्री टेंबे स्वामी हे उत्तम वैद्य,मंत्रसिध्द,यंत्र- तंत्रज्ञ,उत्कृष्ट ज्योतिषी, मराठी व संस्कृत आध्यात्मिक वाड:मयातील प्रतिभावान व परतत्वस्पर्शी सिध्दकवी,वक्ते,हठयोगी,उत्कट
दत्तभक्त व साक्षात दत्तात्रयस्वरूप होते. यांच्या बद्दल एवढे सारे लिहिताना मनाला एकच खंत वाटते की,त्यांना संसार सुख लाभले नाही.जन्मत:च मुलाचा मृत्यु आणि त्यानंतर पत्नीचे देहावसान या गोष्टी ते टाळू शकत होते. पण प्रारब्ध भोग म्हणून त्यांनी त्यांचा स्वीकार केला. स्वामीजींना अनेक विद्या अवगत होत्या. अशा या महान योगीराजाने गरुडेश्वर येथे १९१४ मध्ये समाधी घेतली.
परम पूज्य स्वामी वासुदेवानंद सरस्वती नरसोबावाडीहून माणगावला परतत असताना भगवान श्री दत्तप्रभूंच्या आज्ञेनुसार त्यांच्या एका भक्ताने स्वामीजींना मूर्ती अर्पण केली. या मूर्तीला माणगाव येथे आणण्यात आले. पण मग मंदिर कुठे उभारायचे असा मोठा प्रश्न निर्माण झाला. माणगाव येथील एका विधवेने तिच्या जमिनीचा तुकडा दान म्हणून मंदिरासाठी देऊ केला . लोकांच्या मदतीने स्वामीजींनी आठच दिवसांत एक छोटेसे मंदिर बांधले आणि येथे भगवान दत्तात्रेयांची मूर्ती स्थापित केली. दिवस होता वैशाख शुध्द ५, शके १८०५. भगवान दत्तप्रभू स्वामीजींसोबत माणगाव मंदिरात ७ वर्षे राहिले. आणि ते आजही आत्मा आणि आत्म्याच्या रूपात अमर आहेत.
या दत्त मंदिराचा जीर्णोद्धार महाराणी इंदिराबाई होळकर यांच्या एका भक्ताने १२ मे १९३८ रोजी केला होता. त्या दिवशी वैशाख शुद्ध त्रयोदशी होती.
या मंदिराची रचना आणि रचना शैली हेमाडपंथासारखी आहे. गाभाऱ्यामध्ये भगवान दत्तात्रेयांची संगमरवरी मूर्ती, स्वामीजींची विराजमान मूर्ती, देवी सरस्वती, आद्यशंकराचार्य यांची मूर्ती अशा अनेक मूर्तींची रचना आणि मांडणी केली आहे. गाभाऱ्यासमोर प्रशस्त सभा मंडप आहे.
सभामंडपाच्या प्रवेशद्वाराजवळ गणपतीची मूर्ती आहे. गाभाऱ्यात भगवान दत्तप्रभूची त्रिमुखी संगमरवरी मूर्ती आहे. आदरणीय टेंबे स्वामीजींची बसलेली मूर्ती, आणि आद्यशंकराचार्यांच्या मूर्ती.. देवी सरस्वती, भगवान दत्ताच्या उत्सवाची मूर्ती (एकमुखी) आदी मूर्ती आपल्याला मंदिरात पाहायला मिळतात.
परमपूज्य नांदोडकर स्वामी महाराज, ज्यांनी गुरुप्रतिपदा उत्सव सुरू केला आणि मंदिराच्या कळसावर सोन्याच्या माळा लावल्या, त्यांचे स्मारक मंदिर दत्त मंदिरासमोर आहे.
स्वामीजींच्या जन्मस्थानाचा जीर्णोद्धार करून तेथे आता छोटेसे घर बांधले आहे. ते खूप जुने झाले होते आणि सध्याच्या (सध्याच्या) विश्वस्तांनी ते पुनर्संचयित केले आहे. तत्कालीन अध्यक्ष आदरणीय श्री आबाजी बांदेकर व इतर सदस्यांनी त्यांच्या उंचीला साजेशी स्वामीजींची मूर्ती बसवली आहे. यामागची कल्पना अशी आहे की स्वामीजी पुढे दत्त मंदिरात जाण्यासाठी निघणार आहेत. स्वामीजींची एकमेव उभी असलेली मूर्ती आपण पाहू शकतो. स्वामीजींप्रमाणेच हे त्यांचे बंधू आदरणीय ब्रह्मयोगी सीताराम महाराज यांचे जन्मस्थान आहे. येथे तुम्हाला सीताराम महाराजांचे सुंदर छायाचित्र (पोर्ट्रेट) दिसेल.
स्वामीजींच्या पत्नी श्रीमती अन्नपूर्णाबाई यांची समाधी गंगाखेड येथे आहे, जे महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यातील पवित्र स्थान बनले आहे. हे ठिकाण नव्याने बांधलेले (नूतनीकरण केलेले) आहे.
एका दगडावर आई अन्नपूर्णाबाईच्या पवित्र पावलांचे ठसे बसवले आहेत. स्वामीजींच्या जन्मस्थानी अशाच प्रकारच्या पायाचे ठसे बसवले आहेत. सभामंडपात स्वामीजींच्या शिष्यांची चित्रे आहेत. ते भिंतींवर उभारण्यात आले आहेत. स्वामीजींची जीवनकथा (चरित्र) चित्रात क्रांती मार्गावर (मार्ग) चित्रित केली आहे.
स्वामीजींच्या जन्मस्थानाजवळ एक मोठी इमारत आहे. यतीच्या निवासासाठी एक इमारत देखील आहे. भाविकांना तपस्वींचे पवित्र प्रवचन ऐकण्यासाठी सभागृह बांधण्यात आले आहे.
तेथे महाराणी इंदिराबाई होळकर यांनी दगडांनी बांधलेली विहीर आहे. एक औदुंबर वृक्ष आहे. त्या काळातील दत्त मंदिराजवळचे हे झाड होय . मंदिराच्या
तेथे दोन्ही बाजूला दोन लाकडी खांब उभारलेले आहेत. दुष्ट आत्मे खांबांना चिकटून राहतील आणि स्वामीजींना त्यांची इच्छा सांगतील आणि ते ठिकाण सोडतील. स्वामीजी भक्तांची सुटका करून घेण्यास मदत करतील. हे पाहून गाणगापूरची आठवण येते.
स्वामीजींनी औदुंबर झाडाखाली स्थापित केलेल्या भगवान दत्ताच्या पावलांचे ठसे आहेत. आणि स्वामीजींच्या योग चिन्हांकित पवित्र पादुकांचे ठसेही बसवले आहेत. तसेच आजरेकरबुवांच्या स्मरणार्थ पश्चिमाभिमुख मारुतीची मूर्ती बसवली आहे.
या दत्त मंदिराचा परिसर तसा बऱ्यापैकी विस्तृत आहे. तेथे हार फुले नारळ वगैरे विक्रेत्यांची जी दुकाने आहेत त्यांच्यापैकी एकाने आम्हाला वरती म्हणजे डोंगरात एक गुहा असून तेथे तपश्चर्येचे स्थान आहे असे सांगितले होते. तसेच तिथे मोठा वाघ बसलेला असतो असेही स्थानिक लोक बोलतात.
माणगाव दत्त मंदिर येथील डोंगरावर असणारी "सिद्धाची गुहा' म्हणजे निसर्गाचा कलात्मक आविष्कारच म्हटला पाहिजे. गजबजाटापासून दूर असलेली ध्यानधारणेसाठीची ही जागा पाहण्यासाठी पर्यटक खूप दूरवरून येथे येतात. ही सिद्धाची गुहा अतिशय प्रेक्षणीय आहे. दत्त मंदिराच्या नैऋत्य दिशेस डोंगरात ही गुहा पाहण्यास मिळते. ती हजारो वर्षे जुनी आहे. सुमारे पंधरा फूट लांब अशी ही गुहा असून गुहेत फिरण्यास पुरेशी जागा आहे. गुहा पाहण्यासाठी पायवाटेनेच जावे लागते. १९९२ मध्ये स्वामींच्या एका भक्ताने गुहेजवळ पायऱ्या बांधून घेतल्या आहेत. पायऱ्या चढल्यावर आपण गुहेच्या सर्वांत उंच ठिकाणी येतो. गुहा पूर्णपणे थंड असून आत हवा खेळती आहे. पाणी झिरपून अत्यंत नयनरम्य असे खडकांचे विविध आकार येथे तयार झालेले आहेत. दर वर्षी सहा हजारांहून अधिक माणसे या गुहेला भेट देतात. श्री प. पू. स्वामी महाराजांनी उपासना करून श्री दत्त प्रभूंना येथेच प्रसन्न करून घेतल्याचे सांगितले जाते. स्वामी दररोज या गुहेत ध्यानधारणेसाठी जात असत. आजही या गुहेत सत्यदत्तपूजा केली जाते. यामुळे या गुहेस धार्मिक अधिष्ठान आहे.
या वाघाबद्दलचे सत्य जे काही असेल ते कृपया जाणकारांनी येथे विशद करावे ही नम्र विनंती. आता तिथे वाघ आहे म्हटल्यानंतर तिथपर्यंत जाणे शक्य नव्हते. असो.
माणगाव हे पवित्र क्षेत्र कोकणांत सिंधुदूर्ग जिल्हयात सावंतवाडी जवळ आहे. सावंतवाडी ते कुडाळ या बस मार्गावर माणगाव फाटा लागतो. तिथे उतरून बस मार्गाने ७ किमी. अंतरावर असलेल्या माणगावला जाता येते. कुडाळ पासून माणगाव हे स्थळ चौदा किलोमीटर अंतरावर आहे. सावंतवाडी साठी कोल्हापूरवरून नियमित बससेवा आहे. तसेच या ठिकाणी निवासा साठी भक्त निवास असून दररोज दुपारी १२ वाजता महाप्रसादाची व्यवस्था आहे.
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
सर्व फोटो सौजन्य #गुगल (चूकभूल देणेघेणे)
©️®️ राजश्री (पूजा), कोल्हापूर
9881104117
0 टिप्पण्या