🔰 ओंकार साखर कारखान्याचा नवीन प्रकल्प कार्यान्वित
💢 प्रतिदिन ऊस गाळप 6500 मे.टन
वृत्त एकसत्ता न्यूज
निमगाव /प्रतिनिधी दिनांक 4 डिसेंबर 2024 :
ओंकार साखर कारखाना चांदापुरी या कारखान्याची गाळप क्षमता कमी होती त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसाचे गाळप करण्यात मर्यादा होत्या हे ओळखून परिवाराचे चेअरमन बाबुराव बोञे पाटील, संचालिका रेखाताई बोञे पाटील, संचालक प्रशांत बोञे पाटील यांनी प्रतिदिन गाळप क्षमतेत वाढ करण्याचे काटेकोर पणे नियोजन करून 2024 व 2025 या सिझन साठी चार हजार टन गाळप क्षमतेचा नवीन प्रकल्प मंगळवारी पहाटे 3 वाजता प्रशांत बोञे पाटील यांच्या हस्ते पुजा करून सुरू करण्यात आला. या वेळी प्रशांत बोञे पाटील म्हणाले की आपल्या जुन्या कारखान्याची गाळप क्षमता कमी असल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या संपूर्ण ऊसाचे गाळप करू शकत नव्हतो. ही अङचण लक्षात घेऊन चेअरमन बाबुराव बोञे पाटील यांनी प्रतिदिन गाळप क्षमतेत वाढ व उपपदार्थ निर्मित प्रकल्प हाती घेऊन पूर्णत्वास नेले. त्याचा प्रत्यक्ष शुभारंभ करण्यात आला. भविष्यात ऊस गाळपाची, वाहतुकदारांच्या व ऊस दराची समस्या राहणार नाही. तरी शेतकऱ्यांनी "ओंकार" ला ऊस घालावा असे आवाहन बोञे पाटील यांनी केले. या वेळी जनरल मॅनेजर भिमराव वाघमोडे, कन्सल्टंट सुरेश तावरे, चीफ इंजिनिअर तानाजीराव देवकते, ङिसलरी मॅनेजर पी ङी पाटील, धनाजी पवार, धन्यकुमार जामदाङे, अमोल तरंगे यासह आधिकारी, कर्मचारीवर्ग, वाहतुकदार, ठेकेदार उपस्थित होते.

0 टिप्पण्या