💢 पुणे येथील कृषी आयुक्त कार्यालया समोर दि.30 पासून
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी बेमुदत सत्याग्रह आंदोलन
🟪 शरद जोशी विचार मंच शेतकरी संघटनेचा निर्णय
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 23 डिसेंबर 2024 :
शरद जोशी विचार मंच शेतकरी संघटना पुणे येथील कृषी आयुक्त कार्यालया समोर दि.30 डिसेंबर 2024 पासून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी बेमुदत सत्याग्रह आंदोलन करणार आहे. सरसकट शेतकरी संपूर्ण कर्जमुक्ती सोबतच मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेश प्रमाणे गायीच्या दुधाला 48 रुपये प्रति लिटर म्हशीच्या च्या दुधाला 58 रुपये प्रति लिटर दर मिळावा त्यासोबतच शेतकऱ्यांना सरसकट साडेनऊ टक्के रिकवरी बेस रेट धरून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति टन 3650/- उत्पादन खर्च पर टन विना कपात दर मिळावा किंवा केंद्र सरकारने 24-25 चे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना व राज्य सरकारला केलेल्या आदेशाप्रमाणे 3400 रुपये प्रति टन विना कापात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे त्यासोबतच पूर्वीचीv एफ आर पी ची थकबाकी 15% व्याजासहित ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी यासह गाईच्या दुधाला 48 रुपये प्रति लिटर म्हशीच्या दुधाला 58 रुपये प्रति लिटर सोयाबीन साठी साडेनऊ हजार रुपये प्रतिक्विंटल तर कापसाला साडेबारा हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळावा यासह विविध मागण्यांसाठी शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेचे बेमुदत सत्याग्रह आंदोलन म्हणजेच शेतकरी संवाद यात्रा 30 डिसेंबर 2024 पासून पुण्यातील पुणे येथील कृषी आयुक्त कार्यालयाच्या समोर करण्याचा निर्णय संघटनेने घेतला असल्याने सरकारला तीन महिन्यापूर्वी या संबंधाचे पत्रव्यवहार केलेला आहे अशी माहिती संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा निमंत्रक विठ्ठल राजे पवार यांनी दिलेली आहे असे संघटनेचे राज्य संपर्कप्रमुख व प्रसिद्धीप्रमुख भाग्यवंत नायकुडे यांनी सांगितले.
🟢 शेतकऱ्यांच्या वीज बील मुक्तीचा आदेश शरद जोशींना समर्पित
राज्यातील दोन कोटी होऊन अधिक कृषी उत्पादक शेतकऱ्यांना 52 हजार कोटी रुपयांची सरसकट संपूर्ण शेतकरी संघटनेने विविध ठिकाणी मोर्चे आंदोलन करून मिळवून दिली. तो मुंबई उच्च न्यायालय व राज्य अन्न आयोगाने दिलेला आदेश संघटनेने युगपुरुष शरद जोशी यांना समर्पित केला.
12 डिसेंबर 2024 रोजी श्रद्धेय युगपुरुष शेतकऱ्यांचे पंचप्राण शरद जोशी यांच्या नव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त शरद जोशी विचार म्हणजे शेतकरी संघटना महासंघ यांच्यावतीने हा अर्पण सोहळा साजरा करण्यात आला असल्याची ही माहिती महाराष्ट्र राज्य संपर्क व प्रसिद्धीप्रमुख पत्रकार भाग्यवंत नायकुडे यांनी सांगितली.
0 टिप्पण्या