काव्यविश्व...........✍️
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 10 डिसेंबर 2024 :
🔵 दैत्यखोरं...!
माणसासारखे वागून
माणूस व्हावे तू..!
सोडावे स्वार्थी पण
अंतरात जागून...!
करावे हद्दपार...
मनाचे दुर्गुण..!
बुरसटलेल्या रुढी-परांपरा
मुळा-सगट उपटून...!
व्हावे माणूस तू...
मिथ्ये सत्य जाणून...!
इथे स्वर्ग भाष्यील तू...
भुतली राहून..!
एक माणूस खरा...
भेद उगा कशाला...!
रक्तचा शोधला झरा...
सागर आटला कशाला...!
जा विसरून सारे...
माणूसकीचे वैर...!
कर सिमाउल्घोन...
मन,दैत्यखोरं..!
======================
🟢 लोकशाहीच्या नावाने...!
आत्ताच सुत्राने,
दीली माहिती..!
अंधाराच्या भितीने...
लाईट लावले कीती..?
चोराने दावा केला,
माहितीच्या आधारे..!
आता बोंबतील कशाला...
उगा,बोंबलणारे..!
कारभार हाती आला...
माणूस म्हणून वागावे..!
प्रत्येक माणसाला...
इथे माणूस समजावे..!
गाय -म्हशी,घोडे-हत्ती...
नांदतात येथे एकोप्याने...!
माणूस का भांडत बसती...
लोकशाहीच्या नावाने...!
कवी :
बबनराव वि.आराख
गांगलगाव
जि. बुलडाणा

0 टिप्पण्या