20 पासून देशभक्त कै. धनंजराव इनामदार राज्यस्तरीय
वक्तृत्व स्पर्धेस प्रारंभ
वृत्त एकसत्ता न्यूज
निमगाव/ प्रतिनिधी दिनांक 18 डिसेंबर 2024 : जवाहर शिक्षण प्रसारक मंङळाचे संस्थापक अध्यक्ष देशभक्त गुरुवर्य कै. धनंजयराव इनामदार राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेस 20 डिसेंबर पासून प्रारंभ होत आहे. तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धा निमगाव विद्या मंदिर व ज्युनियर कॉलेज मध्ये १ ते ६ गटात होणार आहेत. गट १ इ १ली ते 2री विषय माझी आई माझे गुरू, २ते४ माझा गाव राजे छञपती, ५वी ते ७ वी मला हावेत आजी आजोबा, ८वी१0वी मोबाईल शाप की वरदान, माझा गुरूवर्य धनंजयराव इनामदार आवङता क्रांतीकारक, ११वी १२वी छञपती संभाजीराजे गीता ज्ञानाचे भांङार, महाविद्यालयीन गट- लक्षात नसलेला बाप, भारताचे उद्योगपती रतन टाटा.
विजेत्या स्पर्धेकांना रविवारी 22ङिंसेबरला दुपारी 3 वाजता प्रांताधिकारी विजया पांगारकर, प्रदीपकुमार काकङे (गट शिक्षणाधिकारी), राजकुमार देशमुख (मोटार निरिक्षक) यांच्या हस्ते शालेय वक्तृत्व स्पर्धेतील बक्षीस वितरण होणार आहे आशी माहिती संस्थेचे अध्यक्ष श्रीनिवास इनामदार, मुख्याध्यापक टी एच ननवरे, स्पर्धा प्रमुख आर वाय् आसबे यांनी दिली.
0 टिप्पण्या