🟦 श्री शंभु महादेवास आ. रणजीतसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते शर्कराभिषेक
💢 "श्री शंकर" स. सा. का. लि. च्या ५१ व्या गळीत हंगामातील पहिल्या साखर पोत्याचे पूजन संपन्न
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 18/11/ 2024 : श्री शंकर सहकारी साखर कारखाना लि. सदाशिवनगर सन २०२४ - २५ च्या ५१ व्या गळीत हंगामातील पहिल्या साखर पोत्याचे पूजन महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी विधानपरिषद आमदार तथा चेअरमन रणजितसिंह मोहिते पाटील, पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील, व्हा चेअरमन ऍड. मिलिंद कुलकर्णी, बाबाराजे देशमुख, चि. विश्वतेजसिंह मोहिते पाटील कारखान्याचे सर्व संचालक मंडळ व माजी संचालक मंडळ, कारखान्याचे एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर स्वरूप देशमुख, कार्यकारी संचालक अभिजित डुबल, जनरल मॅनेजर रविराज जगताप, अधिकारी, कर्मचारी, शेतकरी सभासद तसेच सदाशिवनगर, पुरंदावडे, येळीव, जाधववाडी, तामसिदवाडी, खुळेवाडी, मांडवे गावातील सरपंच, उपसरपंच, प्रमुख कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थित होते
🟦 श्री शंभु महादेवास आ. रणजीतसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते शर्कराभिषेक
साखर पोत्याच्या पुजनानंतर कारखान्याचे चेअरमन तथा विधानपरिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील, सौ सत्यप्रभादेवी मोहिते पाटील, सौ. वैष्णवीदेवी मोहिते पाटील, चि. विश्वतेजसिंह मोहिते पाटील, संचालक मंडळ व जिव्हाळा फाउंडेशन यांनी सदाशिवनगर ते श्री शिखर शिंगणापूर पायी वारी करून श्री शंभु महादेवास पहिली साखर अर्पण करून शर्कराभिषेक केला. यावेळी कार्यकर्ते व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या