सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये झोनल लेवल "अविष्कार २०२५" संशोधन स्पर्धा संपन्न
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 11/11/2024 : डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे अंतर्गत सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रीसर्च, शंकरनगर, अकलूज या अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये दि. १०/११/२०२४ रोजी झोनल लेवल आविष्कार २०२५ ही संशोधन स्पर्धा महाविद्यालय विकास समिती अध्यक्षा स्वरूपाराणी जयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण ढवळे यांनी दिली.
या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून एन. बी. नवले सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनीरिंग, सोलापूर या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर नवले तसेच महाविद्यालय विकास समितीचे सदस्य विराज निंबाळकर व वसंत जाधव हे उपस्थित होते. यामध्ये ॲग्रीकल्चर अँड ऍनिमल हजबंडरी, कॉमर्स मॅनेजमेंट अँड लॉ, इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी, ह्युमॅनिटीज लँग्वेज अँड फाईन आर्ट, मेडिसिन अँड फार्मसी, प्युअर सायन्स या सहा विभागातील प्रोजेक्ट व पोस्टर प्रेझेंटेशन या स्पर्धा विद्यापीठ प्रतिनिधी प्रा. रश्मी तांबारे व प्रा. वेदांत तिडके यांच्या निरीक्षणाखाली घेण्यात आल्या.
या स्पर्धेमध्ये पदवी व पदव्युत्तर पदवी मधून एकूण २१८ विध्यार्थ्यानी आपला सहभाग नोंदविला. पदवीमधून एग्रीकल्चर अँड ऍनिमल हसबंडरी या विभागामध्ये समर्थ सर्वदे,ऑर्चिड कॉलेज, सोलापूर,याने प्रथम, वैष्णवी नरवदे, समर्थ इन्स्टिट्युट फार्मसी, बेल्हे, हिने व्दितीय तर श्रावणी चाकोते, श्री सिद्धेश्वर वुमन कॉलेज, सोलापूर, हिने तृतीय क्रमांक, ह्युमॅनिटीज लैंग्वेज अँड फाईन आर्ट्स या विभागामध्ये समीक्षा उपाध्ये, पद्मिनी कॉलेज ऑफ फार्मसी, दिघंची हिने प्रथम, ताहा अन्सारी, ऑर्चिड कॉलेज, सोलापूर, हिने व्दितीय तर आदित्य ढेरे, समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, बेल्हे याने तृतीय क्रमांक, कॉमर्स मॅनेजमेंट अँड लॉ या विभागामध्ये दिशा देशमुख, श्री गणपती इन्स्टिट्यूट ऑफ फार्मासिटिकल सायन्सेस अँड रिसर्च, टेंभुर्णी हिने प्रथम, रोणी भक्ता, ए. जी. पाटील इन्स्टिट्यूट, सोलापूर, हिने व्दितीय तर अनुराग सानप, अभिनव एज्युकेशन सोसायटी कॉलेज, पुणे,याने तृतीय क्रमांक, प्युअर सायन्स या विभागामध्ये तेजश्री पाटील, अभिनव एज्युकेशन सोसायटीज कॉलेज ऑफ फार्मसी, पुणे, हिने प्रथम, आरती मलकापूरे, समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी, बेल्हे, हिने व्दितीय तर अथर्व मुळे, ज्ञान विलास कॉलेज ऑफ फार्मसी, पिंपरी-चिंचवड,याने तृतीय क्रमांक, इंजीनिअरिंग टेक्नॉलॉजी या विभागामध्ये झरीन चौधरी, ऑर्चिड कॉलेज,सोलापूर,हिने प्रथम, आदित्य घोरपडे, त्रिनीती कॉलेज ऑफ फार्मसी, पुणे, याने व्दितीय तर विवेक धावणे, ऑर्चिड कॉलेज, सोलापूर, याने तृतीय क्रमांक, मेडिसिन अँड फार्मसी या स्पर्धेमध्ये घनश्याम इरेशेट्टी, ऑर्चिड कॉलेज, सोलापूर, याने प्रथम, साक्षी घोळवे, कृष्णराव भेगडे इन्स्टिट्यूट, पुणे, हिने व्दितीय तर पूजा आउटी, समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी, बेल्हे, हिने तृतीय क्रमांक पटकविला. तसेच पदव्युत्तर पदवी मधून एग्रीकल्चर अँड ऍनिमल हसबंडरी या विभागामध्ये शंतनु सुखदेवे, अभिनव एज्युकेशन सोसायटी, पुणे, याने प्रथम, पूजा परहद, कृष्णराव भेगडे इन्स्टिट्यूट, पुणे, हिने व्दितीय तर दत्ता नरुटे, अभिनव एज्युकेशन सोसायटी, पुणे याने तृतीय क्रमांक, ह्युमॅनिटीज लैंग्वेज अँड फाईन आर्ट्स या विभागामध्ये , नवसह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, पुणे, येथील शिवानी मिसाळ हिने प्रथम, व प्रथमेश चोरगे याने व्दितीय तर तेजस डोके, कृष्णराव भेडगे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मासिटिकल एज्युकेशन अँड रिसर्च, पुणे,याने तृतीय क्रमांक, कॉमर्स मॅनेजमेंट अँड लॉ या विभागामध्ये तेजस सराटे, कृष्णराव भेडगे इन्स्टिट्यूट, पुणे,याने प्रथम, अमृता साह, अभिनव एज्युकेशन सोसायटी, पुणे, हिने व्दितीय क्रमांक, प्युअर सायन्स या विभागामध्ये नवसह्याद्री कॉलेज ऑफ फार्मसी, पुणे, येथील साक्षी मसये, हिने प्रथम, व हर्ष पवार याने व्दितीय तर सलोनी कांबळे, कृष्णराव भेडगे इन्स्टिट्यूट, पुणे, हिने तृतीय क्रमांक, इंजीनियरिंग टेक्नॉलॉजी या विभागामध्ये कृष्णराव भेडगे इन्स्टिट्यूट, पुणे, येथील मंगेश गलबले याने प्रथम व दिपाली शिंदे हिने व्दितीय तर निवेदिता वडीले, अभिनय अभिनव एज्युकेशन सोसायटीज कॉलेज ऑफ फार्मसी, पुणे, हिने तृतीय क्रमांक, मेडिसिन अँड फार्मसी या स्पर्धेमध्ये रीमा समनक, नवसह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, पुणे, हिने प्रथम, वैष्णवी चव्हाण, सह्याद्री कॉलेज ऑफ फार्मसी मेथवडे, हिने व्दितीय तर नूतन कांबळे, अभिनव एज्युकेशन सोसायटीज कॉलेज ऑफ फार्मसी, पुणे, हिने तृतीय क्रमांक पटकविला.
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. जयसिंह मोहिते पाटील, महाविद्यालय विकास समिती अध्यक्षा मा. कु. स्वरुपाराणी मोहिते पाटील, संस्थेचे सचिव राजेंद्र चौगुले तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण ढवळे यांनी अभिनंदन केले. सदर स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी स्पर्धेचे समन्वयक म्हणून प्रा. अनिल कोकरे व प्रा. लक्ष्मी काळे यांनी तसेच सर्व विभागाचे विभाग प्रमुख शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रीती सोमवंशी व कु. मिनाक्षी राऊत यांनी तर आभार प्रदर्शन प्रा .सुजाता रिसवडकर यांनी केले.
0 टिप्पण्या