💢 प्रशांत श्रीकांत माळवदे "वास्तुशास्त्र विशारद" पुरस्काराने सन्मानित
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 28/10/ 2024 : पंढरपूर तालुका भाळवणी येथील प्रशांत श्रीकांत माळवदे यांना ज्योतिष वास्तु विश्व संशोधन केंद्र संस्था पुणे यांच्यावतीने वास्तुशास्त्र विशारद पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
हा कार्यक्रम विणकर हॉल पद्मावती पुणे येथे ज्योतिष वास्तु विश्व संशोधन संस्था पुणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. यावेळी तृतीय पदवीदान समारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमामध्ये ज्योतिष वास्तु विश्व संशोधन केंद्र संस्था पुणे संस्थापक अध्यक्ष डॉ. उमेश रमेश कुलकर्णी गुरुजी यांच्याकडे प्रशांत माळवदे यांनी आतापर्यंत विविध वास्तु शास्त्र विषयाचे अध्ययन करून परीक्षेमध्ये त्यांनी विशेष प्राविण्य मिळवले होते. वास्तुशास्त्राच्या वास्तू विशारद या परीक्षेमध्ये विशेषप्रथम श्रेणी व लोलक विद्या विशारद परीक्षेत विशेष श्रेणी मिळाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करून प्रमाणपत्र, श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ज्योतिष पंडित चंद्रकांत दादा शेवाळे, अंकशास्त्रतज्ञ व लेखिका अॅड. सुनीता पागे, अखिल भारतीय ज्योतिष परिषदेचे अध्यक्ष अनिल चांदवडकर, याज्ञिकी वेदशास्त्रे अनिरुद्ध इनामदार गुरुजी, सामटीव्ही वरील भविष्य वेधच्या भविष्यवेत्या लेखिका अंजली पोतदार, श्रीदत्त उपासिका श्रीगुरू प्रिया मालवणकर हे मान्यवर मंडळी उपस्थित होते.
0 टिप्पण्या