भारतीय राष्ट्रवादी पार्टीचे राष्ट्रीय सचिवपदी नियुक्ती झाल्या बद्दल भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे यांचा भाळवणी येथे सन्मान
वृत्त एकसत्ता न्यूज
भाळवणी प्रतिनिधी : येथील ज्येष्ठ पत्रकार तेज न्यूज चॅनलचे संस्थापक संपादक प्रशांत माळवदे यांचे निवासस्थानी सदिच्छा भेटीवर आलेले अकलूज येथील साप्ताहिक अकलूज वैभवचे संस्थापक आणि भारतीय राष्ट्रवादी पार्टीचे राष्ट्रीय सचिव भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे यांचा पंढरपूर येथील कर सल्लागार ॲड.सुहास गोरे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी कुसुम माळवदे, खानापूर नगर पंचायतच्या माजी नगरसेवक सुरेखा डोंगरे, जयश्री वेल्हाळ, प्राची माळवदे, अर्थव डोंगरे, ओंकार माळवदे आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी नायकुडे म्हणाले की माझी निवड झाल्या नंतर हा माझा प्रथमच सन्मान केल्याबद्दल मी आपला आभारी आहे.माझ्या कडून ही तेज न्यूज चॅनल परिवारास माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. यावेळी संपादक प्रशांत माळवदे यांनी आभार मानले.
0 टिप्पण्या