कोजागिरी पौर्णिमेनिमित्त शिवशक्ती देवस्थान गणेश गाव येथे देवीचा छबिना व अग्निहोम सोहळा संपन्न

कोजागिरी पौर्णिमेनिमित्त शिवशक्ती देवस्थान गणेश गाव येथे देवीचा छबिना व अग्निहोम सोहळा संपन्न

अकलूज वैभव न्यूज नेटवर्क/वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे 

मुंबई दिनांक 18/10/ 2024 : शिवशक्ती देवस्थान गणेशगाव (तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर) येथे कोजागिरी पौर्णिमेनिमित्त सालाबाद प्रमाणे देवीचा छबिना आणि अग्निहोम सोहळा भव्यतेने संपन्न झाला.

कोजागिरी पौर्णिमेनिमित्त सायंकाळी मंदिरातील शिवलिंगास शांतवन घालण्यात आले 


त्यानंतर देवीचा पालखी  छबिना ग्रामप्रदक्षिणेस निघाला. छबिण्यात आराधी, पोतराज, जोगते यांनी  ढोल, ताशा, हलगीच्या तालावर पोत  नृत्याचे सादरीकरण केले.


अग्निहोमस्थळाचे पूजन देवस्थानचे सर्वेसर्वा दिगांबर सिताराम बाबर महाराज आणि प्रचारक भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे यांच्या हस्ते झाले. अग्निहोम स्थळ पूजनानंतर दिगांबर सिताराम बाबर, भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे,गणेशगावचे सरपंच सदाशिव जगन्नाथ शेंडगे, उपसरपंच बाळासाहेब भीमराव ढोकळे, माजी सरपंच विठ्ठल शिवाजी नलवडे, गीताई सोसायटीचे चेअरमन हनुमंत सोलंकर, माजी चेअरमन सिताराम शेंडगे, अशोक सिताराम सरवदे महाराज बावडा, इत्यादी मान्यवरांच्या हस्ते सामुदायिक अग्निहोम प्रज्वलन झाले. याप्रसंगी आकाश भिमराव लोंढे महाराज, भीमराव लोंढे, सुनील डावरे, कॅसेट स्टार दिलीप लोखंडे, सोमनाथ हरिहर, आबासाहेब दिगांबर बाबर, लक्ष्मण दिगांबर बाबर, नागनाथ साबळे, खेडे, चांदज, अकलूज, बावडा येथील सोमेश्वर भक्त तसेच बाबुळगाव, संगम, तांबवे, गणेशगाव येथील आराधी मंडळी बहुसंख्येने उपस्थित होती. 

देवस्थान मंदिरात नऊ दिवसांचे अखंड पारायण सुरू होते.  समाप्तीनंतर महाप्रसादाचा उपस्थित भक्त भाविकांनी लाभ घेतला. अग्निहोम प्रज्वलनानंतर सोमनाथ विनवणी आणि देवीची गाणी झाली

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या