ओंकार साखर कारखाना दिवाळीनिमित्त देणार ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोफत साखर - बाबुराव बोत्रे पाटील
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 20/10/ 2024 : ओंकार साखर कारखाना चंदापूरी ( तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर) युनिट एक मध्ये मागील वर्षी च्या ऊस गाळप हंगामात ऊस पुरवठा केलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांनी पुरवठा केलेल्या उसाच्या टनेजच्या प्रमाणात दिपवाळीनिमित्त मोफत साखर वाटप मंगळवार दिनांक 22 ऑक्टोबर 2024 पासून कारखाना कार्यस्थळावर करण्यात येणार आहे अशी माहिती कारखान्याचे चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील यांनी सांगितली. शेतकऱ्यांच्या मालाचे योग्य मोल माप ओंकार परिवाराकडून नेहमीच करण्यात आलेले आहे. दिपवाळीच्या निमित्ताने मोफत साखर देत शेतकऱ्यांची नाते आणखी दृढ करीत आहोत असेही त्यांनी म्हटले. यावेळी कारखान्याचे संचालक प्रशांत बोत्रे पाटील, जनरल मॅनेजर भीमराव वाघमोडे, शरद देवकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
1 ते 30 टनापर्यंत ऊस दिलेल्या शेतकऱ्यांना दहा किलो, 31 ते 50 टनास 20 किलो, 51 ते 100 टना पर्यंत 39 किलो, 101 ते 150 टनापर्यंत 41 किलो, 151 ते 200 टनापर्यंत 50 किलो, 201 ते 300 टनाला 70 किलो 300 टनाच्या पुढे शंभर किलो याप्रमाणे कारखाना स्थळावर 22 ऑक्टोंबर पासून साखर वाटप होणार आहे.
"एरवी ऊस उत्पादक शेतकरी व कारखान्यांमध्ये वेगवेगळ्या कारणावरून वादंग होताना दिसतात. असे असताना ओंकार साखर कारखाना ऊस उत्पादक सभासदांना दिपवाळीच्या पूर्वी मोफत साखर वाटप करून सभासदांचे हित जोपासण्याचे काम करीत असल्याचे मत नॅशनल युनियन बॅकवर्ड एस सी एसटी अँड मायनॉरिटीज महासंघ दिल्ली अर्थात एन. यु. बी. सी. आणि शरद जोशी विचार मंच शेतकरी संघटना महासंघ या दोन्हींचे महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख व प्रसिद्धीप्रमुख जेष्ठ पत्रकार भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे यांनी व्यक्त केले.
0 टिप्पण्या