श्री शंकर सहकारी साखर कारखान्याचे दिपावली निमित्त साखर वाटपाचा शुभारंभ

 

श्री शंकर सहकारी साखर कारखान्याचे दिपावली निमित्त साखर वाटपाचा शुभारंभ

अकलूज वैभव न्यूज नेटवर्क/वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे 

मुंबई दिनांक 08/10/ 2024 : श्री शंकर सहकारी साखर कारखान्याचे सिझन २०२३-२४ मध्ये ऊस पुरवठा करणारे सभासद, ऊस पुरवठा करणारे बिगर सभासद व ऊस पुरवठा न केलेले सभासद यांना दिपावली निमित्त साखर वाटपाचा शुभारंभ विधानपरिषद आमदार तथा चेअरमन  रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आला.

यावेळी श्री शंकर सहकारी चे व्हा. चेअरमन ऍड. मिलिंद कुलकर्णी, पंचायत समितीचे माजी उपसभापती मा.श्री. अर्जुनसिंह मोहिते पाटील, RPI चे जिल्हाध्यक्ष सोमनाथ भोसले, कारखान्याचे संचालक ऍड. सुरेश पाटील, मालोजीराजे देशमुख, दादासो वाघमोडे, महादेव शिंदे,  तसेच सदाशिवनगरचे सरपंच विरकुमार दोशी, पुरंदावडे चे उपसरपंच देविदास ढोपे, उपसरपंच उदय धाईंजे, हुसैन मुलाणी, विलास फडतरे, तानाजी ओवाळ, विलास निंबाळकर, तुकाराम चव्हाण, अभिमान सावंत, संतोष शिंदे,लक्ष्मण मोहिते,एकनाथ वाघमोडे तसेच कारखान्याचे एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर स्वरूप देशमुख, कार्यकारी संचालक अभिजित डुबल, तसेच शेतकरी सभासद, ग्रामस्थ, कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमानिमित्त उपस्थित सर्व मान्यवरांना चेअरमन तथा विधानपरिषद आमदार  रणजितसिंह मोहिते पाटील यांनी सर्वांना विजयादशमी (दसरा ) व दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या