ओंकार साखर कारखान्याचा ऊसउत्पादकांना मोफत साखर वाटपाचा शुभारंभ
वृत्त एकसत्ता न्यूज
निमगाव / प्रतिनिधी दिनांक 21/10/2024 : ओंकार साखर कारखाना चांदापुरी युनिट एक च्या दिवाळी साठी मोफत साखर वाटपाचा शुभारंभ ओंकार साखर कारखाना परिवाराचे संचालक प्रशांतराव बोञे पाटील व चांदापुरीचे सरपंच जयवंत सुळ तरंफळचे माजी सरपंच नारायण कचॅ व शांतिलाल काटकर, जनरल मॅनेजर भिमराव वाघमोङे यांच्या हस्ते ऊसउत्पादक माहिला शेतकरी सौ पुष्पवती लावंङ व सौ ज्योती कारंङे व हनुमान गायकवाड यांना प्रातिनिधीक स्वरूपात साखर देऊन करण्यात आला.
ओंकार साखर कारखाना परिवाराच्या वतीने ऊसाच्या प्रमाणात ऊस उत्पादक शेतकरी व कामगार यांची दिवाळी गोङ व्हावी व आपण ज्या समाजात राहतो त्याचे काहीतरी देणे लागतो या सामाजिक भावनेतून कारखान्याचे चेरअमन बाबुरावजी बोञे पाटील, संचालक प्रशांतराव बोञे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भविष्यातही ऊस उत्पादकाच्या हिताच्या योजना राबिल्या जातील.
मोफत साखर वाटप केल्याबद्दल ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने प्रशांतराव बोञे पाटील यांचा सन्मान करण्यात आला रामचंद्र मगर, नितीन जाधव, सर्जेराव पिंगळे, आजिनाथ तरंगे, बाळासाहेब देवकर, बापु मगर, यासह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते. केन मॅनेजर शरट देवकर यांनी सर्वांचे आभार मानले.
0 टिप्पण्या