विलासचंद्र एम. मेहता औद्योगिक प्रशिक्षण संस्था दहिगाव येथे खंडे महानवमी उत्साहात साजरी

विलासचंद्र एम. मेहता औद्योगिक प्रशिक्षण संस्था दहिगाव येथे खंडे महानवमी उत्साहात साजरी

अकलूज वैभव न्यूज नेटवर्क/वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे 

मुंबई दिनांक 15/10/ 2024 :  खंडेमहानवमी म्हणजे या दिवशी शिल्पकार आणि कारागीर आपआपल्या पारंपरिक कौशल्याच्या अवजारांची पूजा करतात. औद्योगिक प्रशिक्षण संस्था मध्ये असणाऱ्या सर्व मशिनरी, साधनसामग्री हे मुलांना तंत्र शिक्षणाचे धडे शिकवत असतात. त्या मशिनरी ची पूजा केली जाते. अशाप्रकारे विलासचंद्र एम. मेहता औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये खंडे महानवमी उत्साहात संपन्न झाली. मान्यवरांच्या उपस्थितीत ऑफिस व सर्व ट्रेडच्या मशनरी चे पूजन केले.  

याप्रसंगी रत्नत्रय एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष  अनंतलाल रतनचंद दोशी, नातेपुते प्री स्कूलचे चेअरमन  वैभव शहा, आयटीआयचे प्राचार्य गजेश जगताप  व स्पर्धा परीक्षा अकॅडमीचे मुख्याध्यापक  सतीश हांगे  उपस्थित होते.

एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष अनंतलाल दोशी, संस्थेचे खजिनदार अमृत  गांधी, संस्थेचे ट्रस्टी  बाहुबली चंकेश्वरा, रत्नत्रय एज्युकेशन सोसायटीचे सचिव व विलासचंद्र एम. मेहता आयटीआयचे मार्गदर्शक  प्रमोद अनंतलाल दोशी, विलासचंद्र एम. मेहता आयटीआयचे चेअरमन  विशाल गांधी, रत्नत्रय स्पर्धा परीक्षा ॲकॅडमीचे चेअरमन रोनक चंकेश्वरा, नातेपुते प्री स्कूलचे चेअरमन वैभव शहा, रत्नत्रय एज्युकेशन सोसायटीचे तज्ञ संचालक  निश्चल होरा व  अमित गांधी यांनी महाखंडे नवमी निमित्त शुभेच्छा दिल्या. 

सदर कार्यक्रम पार पाडण्यासाठी  शिवराम नाळे , निलेश शेंडे, गणेश खंडागळे, सौ. स्नेहल थोरात, सौ पूजा चव्हाण, सुभाष शिरतोडे, आगतराव किर्दक  व सर्व विद्यार्थ्यांनी  परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या