💢 माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाची सांगली जिल्हा नूतन कार्यकारिणी जाहीर 🟡 सांगली जिल्हाध्यक्ष पदी विश्वनाथ पवार तर उपजिल्हाध्यक्षपदी संदीप मोरे

 

💢 माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाची  सांगली जिल्हा नूतन कार्यकारिणी जाहीर 

🟡 सांगली जिल्हाध्यक्षपदी विश्वनाथ पवार तर उपजिल्हाध्यक्षपदी संदीप मोरे

अकलूज वैभव न्यूज नेटवर्क/वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे 

मुंबई दिनांक 16/10/ 2024 : माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ ही राज्यव्यापी संघटना सामाजिक व प्रशासकीय लोकोपयोगी कामात नेहमी अग्रेसर असणारी व संपुर्ण महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यांमध्ये विखुरलेली मोठी संघटना म्हणून ओळखली जाते. या संघटनेच्या माध्यमातून नेहमी समाजातील सर्व अडले-नडलेल्या सर्व लोकांना प्रशासकीय कामांमध्ये निस्वार्थपणे मदत करणे, प्रशासनातील गैरव्यवहार उघडं करून प्रशासनातील भ्रष्ट कारभार करणाऱ्यांवरती नेहमी वचक ठेवण्याचे काम ही संघटना मा. संस्थापक अध्यक्ष सुभाष बसवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गेली अनेक वर्षापासून निरंतर करत आली आहे. 

     याच माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाची आज नूतन सांगली जिल्हा कार्यकारणी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुभाष बसवेकर  यांच्या आदेशाने व पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख  बंडू जिन्नाप्पा चौगुले, कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष जयराज कोळी यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली जाहीर कऱ्यण्यात आली. यामध्ये संघटनेच्या नूतन जिल्हाध्यक्षपदी वाळवा तालुक्यातील करंजवडे गावचे  विश्वनाथ पवार यांची तर उपजिल्हाध्यक्ष पदी क. महंकाळचे  संदीप मोरे यांची निवड करण्यात आली तसेच महासंघाच्या जिल्हा सरचिटणीस पदी इस्लामपुरमधील सेवानिवृत्त मंडल अधिकारी प्रकाश कबुरे, जिल्हा खजिनदार पदी वाळवा तालुक्यातील सेवानिवृत्त पोलिस उपनिरीक्षक जयनाथ चव्हाण , जिल्हा सचिव पदी  विटाचे प्रशांत कदम , जिल्हा संघटक पदी जतचे श्रीशैल्य निवर्गी , संपर्क प्रमुख पदी मिरजचे पुष्पक चौगुले , प्रचारप्रमुख पदी सुहास व्हणखंडे, उपसंपर्क प्रमुख पदी सुहास केरीमाने व जिल्हाध्यक्ष महिला आघडीपदी सौ. रूपाली चौगुले यांची निवड करण्यात आली. त्याबरोबर संघटनेच्या वाळवा तालुकाध्यक्ष पदी धनाजी पाटील, खानापूर तालुकाध्यक्ष पदी  सूरज लांडगे , खानापूर तालुका कार्याध्यक्ष पदी  प्रदीप कदम , क. महंकाळ तालुकाध्यक्ष पदी दिलीप कांबळे यांचीही निवड यावेळी करण्यात आली. 

सदर कार्यक्रम वाळवा तालुक्यातील डोंगरवाडी येथे संपन्न झाला यावेळी बोलताना माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष जयराज कोळी यांनी सर्व नूतन पदाधिकाऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन करत माहिती अधिकार कायदा, दप्तर दिरंगाई कायदा यासह अनेक लोकोपयोगी कायदे हे सर्वसामान्यांना लाभलेले वरदान असून त्यांचा अभ्यास करून व प्रभावीपणे वापर करून प्रशासनाकडून जनसामान्यांना न्याय मिळवून द्यावा, प्रभावीपणे प्रशासनावरती व प्रशासनातील भ्रष्ट कारभार करणाऱ्यांवरती वचक ठेवून स्वच्छ प्रशासकीय कारभार व्हावा यादृष्टीने सर्वांनी प्रयत्न करण्यासंदर्भात मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी कोल्हापूर जिल्हाध्यक्ष जयराज कोळी व पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख  बंडू चौगुले यांच्या हस्ते सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे व पुष्पगुच्छ देऊन सर्वांचा सन्मान व अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी नूतन जिल्हाध्यक्ष  विश्वनाथ पवार यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या