रानभाजी - मोहदोडे

 

रानभाजी - मोहदोडे  

शास्त्रीय  : मधुका लॉंगीफोलिया

स्थानिक  : मोहा, मोहट्या, महुआ

इंग्रजी  : बटर ट्री

अकलूज वैभव न्यूज नेटवर्क/वृत्त एकसत्ता न्यूज 

संग्राहक : प्रविण सरवदे/ आकाश भाग्यवंत नायकुडे 

मुंबई दिनांक 10/10/ 2024 : मोहदोडे ही आरोग्यदायी आणि चवदार, एकदा तरी खावी अशी रानभाजी. सहज उपलब्ध असणारी, चवीला तुरट व गोडसर असणारी ही रानभाजी. ही रानभाजी म्हणजे मोहाची फळे. काही भागात मोहदोडे किंवा मोहट्या पण म्हणतात. अतिशय आरोग्यदायी आणि फायदेशीर असा हा कल्पवृक्षच. भारतातील चाळीस पन्नास जिल्ह्यात तरी हा मोहवृक्ष आढळतो. या वनस्पतीच्या पानांपासून पत्रावळी, औषधे, मोहफुलांचा गुलकंद, लाडू, हलवा असे विविध पदार्थ बनवले जातात. मोहाचे नाव ऐकले की आपल्याला फक्त मोहाची दारू इतकेच आठवते. पण अतिशय उपयुक्त असा हा वृक्ष ज्याचा प्रत्येक भागाचे अनेक उपयोग आहेत. फुले नावा प्रमाणेच गोडसर असतात. खोडाची साल ऊकळवून खोकला, सर्दि, कफ, ताप यासाठी उपयुक्त आहे. पाने गरम करून जखम बरी करण्यासाठी लावली जातात. अंगावर पुटकुळ्या झाल्या तर मोह फूल लावल्यास आराम मिळतो. मोह तेलाने डोके दुखी थांबते. खोकला आल्यास फुले भाजून किंवा उकळून खातात. ही फुले मार्च महिन्यात येतात. अनेक आदिवासी ही फुले, फळे गोळा करून सुकवून ठेवतात. पावसाळ्यात भाजीसाठी याचा उपयोग होतो आणि आरोग्यासाठीही. अतिशय कमी साहीत्यात ही भाजी बनवली जाते. व्हेज आणि नाॅनव्हेज पद्धतीने पण बनवली जाते. म्हणजे थोडीशी ओली, सुकी मासळी घालूनही बनवली जाते. शरीराला बल देणारी ही भाजी आहे. यामुळे आपले आरोग्य चांगले राहील. म्हणूनच आजची ही मोहदोड्याच्या भाजीची रेसीपी व्हीडिओ लिंक खाली दिली आहे.

पाककृती : मोहाची फळे (व्हिडियो)

https://youtu.be/LvLylPG1cAI

संकलन : मिलिंद पंडित, कल्याण

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या