मिहीर गांधी यांचा युवा रत्न पुरस्काराने सन्मान म्हणजे खऱ्या अर्थाने केलेल्या कार्याची पोचपावती : अनंतलाल दोशी

मिहीर गांधी यांचा युवा रत्न पुरस्काराने सन्मान म्हणजे खऱ्या अर्थाने केलेल्या कार्याची पोचपावती : अनंतलाल दोशी 

अकलूज वैभव न्यूज नेटवर्क/वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे

मुंबई दिनांक 04/09/2024 : भागातील एक मोठा कार्यकर्ता , सकल जैनसमाज समाजातील सर्व  शैक्षणिक व आरोग्यविषयक अडचणी सोडवणारा रत्न म्हणजे मिहीर गांधी  महाराष्ट्र राज्य तीर्थक्षेत्र कमिटीचे ५ वर्षासाठी बिनविरोध अध्यक्ष म्हणून निवड झाली यासाठी त्यांना रत्नत्रय परिवार व सकल जैन समाज सदाशिवनगर, पुरंदावडे ,येळीव, मेडद मांडवे व  परिसरामधील समाजातील लोकांनी त्यांना "युवारत्न" पुरस्काराने सन्मानित केले आणि हा पुरस्कार म्हणजे खऱ्या अर्थाने त्यांच्या कार्याची पोहचपावती असे प्रतिपादन पुरस्कार प्रदान करतेवेळी अनंतलाल दोशी यांनी केले. 

कार्यक्रमाचे अध्यक्ष  बाबुभाईगांधी म्हणाले मिहीर गांधी यांचा स्वभाव अतिशय प्रेमळ, सर्वाना एकत्र करून घेण्यारा असल्यामुळे या पदावर पोचले. सत्कारास  उत्तर देताना मिहीर गांधी  म्हणाले सकल जैन समाज सदाशिवनगर परिसरातील व रत्नत्रय परिवाराने लावलेलं हे रोपट वटवृक्षामध्ये रूपांतरित होत असताना या रत्नत्रय संस्थेतून शिकून संस्कार घेऊन विद्यार्थी सर्व भारतभर जावेत स्वतःबरोबर शाळेचे  नाव पंचक्रोशीत करावे अशा शुभेच्छा मिहीर गांधी यांनी दिल्या.  

या कार्यक्रमासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष बाबुभाई गांधी, भारतीय सकल जैन समाजचे अध्यक्ष, मिहीर गांधी, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अनंतलाल  दोशी, सदाशिवनगर ग्रामपंचायत सरपंच, व संस्थेचे मार्गदर्शक   विरकुमार दोशी, रत्नत्रय योजनेचे सचिव व स्कूलचे चेअरमन  प्रमोद दोशी, एज्युकेशन सोसायटीचे सदस्य, स्कूल कमिटी सदस्य, अभिजीत दोशी, विशाल गांधी, निश्चल व्होरा ,प्रशांत दोशी , संजय गांधी, निवास गांधी, अजय गांधी तुषार गांधी, वैभव मोडाशे सुरज दोशी , राहुल दोशी, , सुहास दोभाडा, बाहुबली दोशी, अमित गांधी वैभव शहा ,रोनक चकेश्वरा, तनोज शहा,  स्वप्निल गांधी ,प्रतिक गांधी, चंद्रकांत तोरणे,  दत्ता भोसले , रामदास गोपने , गजेश जगताप ,सतीश हागे, मुख्याध्यापक वाघमोडे , पालक, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गळवे  व आभार देसाई  यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या