हिंदी काव्यवाचन स्पर्धेत भिवाजी कांबळे यांचा प्रथम क्रमांक तर इम्रान मुजावर ठरले दुसऱ्या क्रमांकाचे मानकरी

 हिंदी काव्यवाचन स्पर्धेत भिवाजी कांबळे यांचा  प्रथम क्रमांक तर इम्रान मुजावर ठरले दुसऱ्या क्रमांकाचे मानकरी 

अकलूज वैभव न्यूज नेटवर्क/वृत्त एकसत्ता न्यूज 

कोडोली/ प्रतिनिधी दिनांक 15/9/ 2024 : कोडोली ( ता.  पन्हाळा, जि. कोल्हापूर )  येथील यशवंत शिक्षणशास्त्र महाविद्यालयात ( बी. एड. कॉलेज )  हिंदी दिवस सप्ताहाच्यानिमित्ताने घेण्यात आलेल्या हिंदी भाषेतील स्वरचित काव्यवाचनस्पर्धेत भिवाजी शंकर कांबळे या विद्यार्थी - शिक्षकाने प्रथम क्रमांक पटकावला.  येथील अध्यापक विद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य मोहन राबाडे  प्रमुख पाहुणे होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे हिंदी विभागप्रमुख  प्रा. एस. डी. रक्ताडे होते . प्राचार्य डॉ. विश्वनाथ पाटील यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. वरील त्रयींच्या हस्ते विजेत्या  कवींना प्रमाणपत्रे देण्यात आली. याप्रसंगी त्यांच्या हस्ते  महाविद्यालयाच्या परिसरात आमरवृक्षांची  लागवड करण्यात आली.

काव्यवाचन स्पर्धेत द्वितीय क्रमांक शीघ्र कवी इम्रान दस्तगीर जमादार यांनी पटकावला. तृतीय क्रमांक पूजा विजय चव्हाण - पाटील व प्राजुली दत्तात्रय साळुंखे या दोघींना विभागून देण्यात आला.

     "भाषा व साहित्य माणसांना सर्व क्षेत्रांत उभे करण्याचे काम करते," असे प्रमुख पाहुणे म्हणाले. अध्यक्ष मनोगत व्यक्त करताना  प्रा. एस. डी. रक्ताडे म्हणाले की, इंग्रजी भाषा बोलणारा हुशार असतो हा समाजाचा गैरसमज आहे.  इंग्रजांच्या  मानसिक गुलामगिरीचा तो प्रभाव आहे. प्राचार्य डॉ. विश्वनाथ पाटील यांनी हिंदी बोलताना मराठी शब्द आले तर लोक हसतात,. मात्र हिंदी बोलण्यात इंग्रजी शब्द आल्यास लोक त्याचे कौतुक करतात. अशाने भाषा समृद्ध कशी होणार , असा सवाल त्यांनी उपस्थित केला.  काव्यवाचन स्पर्धेच्या  परीक्षण प्राध्यापिका गुलणास मुजावर आणि प्रा. संजय जाधव यांनी केले. श्रीमती मुजावर यांनी मनोगत व्यक्त केले.

     अंकिता देशमुख यांनी प्रास्तविक केले. पूजा बनसोडे यांनी सूत्रसंचलन केले. ऋतुजा राजेंद्र चोपडे यांनी आभार मानले. यावेळी प्रा. अजित लोकरे, कार्यालीन अधीक्षक एस . के. पाटील उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तानाजी मोहिते यांनी परिश्रम घेतले. सृजनशीलता आणि व्यक्तिमत्त्व विकास विभाग आणि हिंदी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या