पात्र मतदार मतदानापासुन वंचीत राहु नये म्हणुन मतदान केंद्रांमध्ये बदल-विजया पांगारकर



पात्र मतदार मतदानापासुन वंचीत राहु नये म्हणुन मतदान केंद्रांमध्ये बदल-विजया पांगारकर

अकलूज वैभव न्यूज नेटवर्क/वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे

मुंबई दिनांक 01/09/2024 : आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये एकही पात्र मतदार मतदाना पासुन वंचीत राहु नये या ऊद्देशाने माळशिरस विधानसभा मतदार संघात सुसूत्रीकरण अंतर्गत तीन मतदान केंद्राचे  स्थानात बदल करण्यात आला ,सात नवीन मतदान केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे.तसेच ७७ मतदान केंदातील मतदारांचे विलणीकरण करण्यात आल्याची माहिती निवडणुक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी विजया पांगारकर यांनी पत्रकार परीषदेमध्ये दिली.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजीत पत्रकार परीषदेमध्ये प्रातांधिकारी विजया पांगारकर यांनी मतदार केंद्राच्या नावातील बदल,केंद्रांच्या स्थानातील बदल, मतदार संघातील नवीन केंद्र ,आणि प्रत्येक मतदान केंद्रावर समान मतदार संखेसाठी विलीन मतदार केंद्रांची माहिती दिली.

 नाव क्रमांक बदल-एकुण 6 मतदान केंद्र-

जाधववाडी-110, पानीव-168 (नवीन क्रमांक-170) वेळापुर-296 (नवीन क्र.301), तांदुळवाडी-325, 326,327(नवीन क्र.331,332,333)

या तीन मतदान केंद्रांच्या स्थानात बदल-

देशमुखवाडी-4, पठाणवस्ती (वाणीवाडी)-203, (नविन क्र.205) दसुर-334 (नविन क्र.-340)

लोकसभा निवाडणुकीमध्ये असलेल्या ३३८ मतदान केंद्रामध्ये नवीन सात केंद्राची वाढ करण्यात आली.

नविन मतदान केंद्र-7

 माळशिरस 137,142, मगरवाडी (गारवाड) 207, सुळेवाडी-210, अकलुज (दत्तनगर)-271, काळमवाडी-315, ऊघडेवाडी-345

 77 मतदान केंद्रांचे झाले विलनीकरण

मतदान केंद्रांवरील मतदार संखेत असणारी विषमता टाळण्यासाठी सरासरी 1350ते 1500 मतदारांसाठी एक मतदान केंद्र व्हावे यासाठी 77 मतदान केंद्रांचे विलनीकरण करण्यात आले.

विलिन मतदान केंद्राची संख्या व क्रमांक (जुने मतदान केंद्र क्रमांक)

कुरबावी- 6 व 7. डोंबाळवाडी 8 व 9, कारुंडे 17 व 18 एकशिव 28 व 29,  नातेपुते - 47, 52, 53, 54, 58, 59, 60, फोंडशिरस 70, 71, 72, 75, 77, फडतरी 81 व 82, मांडवे 89 व 90, सदाशिवनगर 105 व 106.,तिरवंडी 127 व 129, माळशिरस, 135, 136, 137, 138, 139, 140, 141,142,144, 145, तरंगफळ-164 व 165, यशवंतनगर 182 व 185, सुळेवाडी 205 व 206, पिलिव 207, 209, 210, 212, पिसेवाडी 223 व 225,माळेवाडी अकलुज 230 व 231, अकलुज, 248, 249, 255, 266. संग्रामनगर 260, 261, 263, 264, तांबवे, 277 व 279. वेळापूर 293, 294, 297, 300. कोळेगाव -316, 317, 318. तांदुळवाडी 322 व 324, धानोरे 329 व 330 दसुर 333 व 334,उघडेवाड 337 व 338

लोकसभा निवडणुकीत वगळलेल्या मतदारांची B,L.O. करणार चौकशी 

यावेळी विजया पांगारकर यांनी लोकसभा निवडणुकीत वगळण्यात आलेल्या 8 हजर 500 मतदारांची चौकशी करण्यात येणार आहे. प्रत्येक मतदाराच्या घरी BLO जावुन  चौकशी करणार आहेत. मतदार मयत असेल तर मयताचा दाखला आवश्यक असल्याचे सांगुन चुकीने एखादा मतदार यादीतुन वगळण्यात आला असेल तर ६ नंबरचा फाॕर्म भरण्याच्या सुचना त्यांनी दिल्या.

महिला मतदारांची नोंदणी होणे आवश्यक

मतदार यादीमध्ये महिलांचे सरासरी प्रमाण सोलापुर जिल्ह्यात 937 तर माळशिरस तालुक्यात 929 इतके आहे.तालुक्यातील 65 गावात महिलांचे मतदार यादीत असलेली अल्प नोंद ही लोकशाहीसाठी चांगली नाही.भविष्यात शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी महिलांचे मतदार यादी मध्ये नाव असणे अत्यंत महत्वाचे आहे.त्यासाठी ज्या महिलांचे नावे मतदार यादीमध्ये नाहीत त्यांनी तात्काळ नोंद करुन घेण्याचे अवाहन प्रातांधिकारी विजया पांगारकर यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या