कु. जुलेखा पठाण यांची सहाय्यक स्थापत्य अभियंतापदी निवड

 


वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे

मुंबई दिनांक 4ऑगस्ट 2024 : 

महाराष्ट्र शासन जलसंपदा विभागाच्या वतीने ३१ डिसेंबर २०२४ रोजी घेण्यात आलेल्या सरळ सेवा भरती परीक्षेत कु.जुलेखा पठाण यांची सहाय्यक स्थापत्य अभियंतापदी निवड झाली.

शंकरनगर अकलूज येथील सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲण्ड रिसर्च, अभियांत्रिकी महाविद्यालय सिव्हील शाखेची ती माजी विद्यार्थिनी असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रविण ढवळे यांनी दिली.

कु.जुलेखा पठाण हिच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील, महाविद्यालय विकास समितीच्या अध्यक्षा स्वरूपाराणी मोहिते पाटील, संस्थेचे सचिव  राजेंद्र चौगुले यांनी तिचे विशेष कौतुक व अभिनंदन केले.  तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी देखील तिने मिळविलेल्या यशाबद्दल तिचे अभिनंदन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या