प्रासंगिक.........✍️
हिमनगाचे टोक
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 24 ऑगस्ट 2024 :
आपणा सर्वांना माहीत आहेच समुद्रामध्ये जे हिमनग असतात ते एक सप्तांश पाण्यावर व सहा सप्तांश पाण्यामध्ये बुडलेले असतात त्यामुळे आज अखेर हजारो जहाजे या हिमनगाची कल्पना न आल्याने अपघात ग्रस्त होऊन नष्ट झाली आहेत.
तर ऑगस्ट महिन्याच्या सात-आठ तारखेपासून आपल्या देशामध्ये एका घटनेवर बराच कोलाहल, संताप, आंदोलने,कोर्टबाजी सुरू आहे. ही घटना म्हणजे कलकत्त्याच्या मेडिकल कॉलेजमधील एका तरुण महिला डॉक्टरचा अनैसर्गिक मृत्यू. सुरुवातीला या मृत्यूला आत्महत्या ठरवण्याचा प्रयत्न झाला ज्याप्रमाणे आपल्या महाराष्ट्रात दिशा सालीयानचा खून आत्महत्या ठरवण्यात आला आहे. त्यानंतर मात्र या घटनेतील सत्य बाहेर येण्यास सुरुवात झाली. जनप्रक्षोभ पाहून सदरची घटना तपासासाठी सीबीआय कडे सोपवण्यात आली आणि एका रात्री सात ते आठ हजार गुंड एकत्र झाले व त्यांनी या दवाखान्यावर हल्ला केला. त्यामध्ये या दवाखान्यातील तीन मजले उध्वस्त करण्यात आले.
पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न
प्रथमदर्शनी पाहताना असे वाटते की बलात्काराच्या घटनेतील पुरावे नष्ट करण्यासाठी हा ममता सरकार नियोजित हल्ला होता. हे पण होतेच पण या हॉस्पिटलमध्ये मानवी अवयवांची तस्करी, मृतदेहांची तस्करी व हजारो प्रकारचे गुन्हेगारी स्वरूपाची कामे चालत हे सर्व सीबीआयचे तपासात निष्पन्न होईल म्हणून हा सरकारी नियोजनबद्ध झालेला हल्ला करण्यात आला आहे.
सुप्रीम दखल
आता या प्रकरणाची सुप्रीम कोर्टाने स्वतः दखल घेऊन याची तपासणी सुरू केली आहे त्यातून अनेक धक्कादायक व संवेदनाहीन गोष्टी बाहेर येत आहेत.
पैशासाठी काय पण
हे राजकीय नेते व काही डॉक्टर यांनी आपले उद्दिष्ट ठेवले आहे त्यांची सर्व कुकर्मे नक्कीच उघडकीस येणार आहेत.
सर्वाचेच वस्त्रहरण
या एका घटनेने त्या दुर्दैवी पीडित मुलीला निवस्त्र करण्यात आले नाही पण ममता सरकार व त्यांचे पाठीराखे ममता सरकारची बाजू घेणारे इंडिया आधाडीचे सर्व नेते सर्वांचे वृत्तीचे वस्त्रहरण होत आहे.
छोट्या मोठ्या गोष्टीवर पत्रकार परिषदा घेणारे संसद रत्न असणारे खासदार, मीडियाकर्मी, प्रिंट मीडिया मूग गिळून गप बसली आहे.
बलात्काराची घटना ही नक्कीच हिमनगाचे वरचे टोक आहे. त्याच्या खाली काय काय दडलय हे सुप्रीम कोर्टात उघडीकीला येऊ लागले आहे.
छद्मी हास्य व संवेदनहीनता
रात्रंदिवस संविधान संविधान म्हणून छाती पिटणारे कपिल सिब्बल याची संवेदनहीनता सुप्रीम कोर्टात दिसून आली या प्रकरणाची सुनावणी सुरू असताना कपिल सिब्बल छद्मीपणाने हसत होते. सुप्रीम कोर्टाच्या बार असोसिएशनचे अध्यक्ष यांची संवेदनहीनता पाहून व छद्मीपणाचे हास्य पाहून सुप्रीम कोर्टातील ज्या वकीलानी यांना निवडून दिले आहे. त्यांचेही वस्त्रहरण होत आहे.
ॲड अनिल रुईकर
98 232 55 049
इचलकरंजी
0 टिप्पण्या