💢 नवीन भाग क्रमांक आणि नवीन मतदान केंद्र बाबत जाहीर आवाहन



💢 नवीन भाग क्रमांक आणि नवीन मतदान केंद्र बाबत

जाहीर आवाहन

वृत्त एकसत्ता न्यूज

आकाश भाग्यवंत नायकुडे

मुंबई दिनांक 24/08/2024 : तमाम मतदार बंधू-भगिनीं, नव मतदार यांना कळविण्यात येते की, महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग, जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सोलापूर, निवडणूक अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी माळशिरस विभाग अकलूज 254 माळशिरस (अ.जा)  विधानसभा मतदारसंघ यांचे निर्देशान्वये अकलूज संग्रामनगर आणि माळेवाडी (अ), यशवंतनगर मधील सर्व मतदारांना कळविण्यात येते की माळशिरस तालुक्यामध्ये नवीन मतदान केंद्र निर्माण झालेले असलेले दत्तनगर अकलूज येथे एक नवीन मतदान केंद्र 271 झालेले आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशांवये प्रत्येक मतदान केंद्रावर 1300 पर्यंत मतदार ठेऊन 1300 वरील मतदारसंघ शेजारील लगत असलेल्या मतदार केंद्रात विलीन करण्याचा निर्देश असल्याने अकलूज येथील मतदान केंद्र २४९ मधील ३४० मतदार मतदान केंद्र 248 मध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत. संग्रामनगर मधील मतदान केंद्र 261 मधील 171 मतदार 260 मध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. मतदान केंद्र 264 मधील 316 मतदार मतदान केंद्र 263 मध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत.

दत्तनगर अकलूज येथील मतदान केंद्र 265 मध्ये 615 मतदार व मतदान केंद्र 266 मधील 328  मतदार नवीन मतदान केंद्र 271 मध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत मालेवाडी मधील मतदान केंद्र 231 मधील 140 मतदार मतदान केंद्र 230 मध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे तसेच यशवंत नगर येथील मतदान केंद्र 182 मधील 286 मतदार मतदान केंद्र क्रमांक 185 मध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत.

 तसेच दिनांक 23/ 1/ 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या मतदार याद्या मध्ये मयत, स्थलांतरित व अपसेंट मतदार यांचे नावावर डिलीटेड शिक्का होता त्या सर्व मतदार यांची वगळणी करण्यात आली असून नवीन प्रारूप मतदार यादी दिनांक 06/08/2024 रोजी यादी व मतदान केंद्रावर प्रसिद्ध केलेली आहे. सदर यादीमध्ये नाव नसल्यास फॉर्म नमुना नंबर 6 व दुरुस्ती असल्यास फॉर्म नमुना क्रमांक 8 फॉर्म  व वगळणी असल्यास फॉर्म नमुना नंबर 7 भरून आपले प्रभागाचे बी एल ओ कडे देणेत यावेत. तसेच नव मतदार यांना आवाहन करण्यात येते की त्यांनी फॉर्म नंबर 6 व वयाचा दाखला, आधार कार्ड सह आपले प्रभागाचे बीएलओ, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याशी संपर्क करावा. अर्हता दिनांक 1/7/2024. तसेच नवीन मतदान केंद्र वाढ झाली असल्याने आपले प्रभागाचे नंबर बदललेले आहेत याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी ही विनंती. याची माहिती संबंधित बीएलओ कडून घेण्यात यावी असे असे आवाहन अकलूज मंडळ अधिकारी चंद्रकांत भोसले यांनी केले आहे. याप्रसंगी अकलूज गाव कामगार तलाठी किसनराव शिंदे तलाठी गणेश भानवसे, यशवंतनगर तलाठी एन एस मोरे, बागेवाडी तलाठी श्रीमती एस एन निकम यांचे सह अकलूज मंडल खालील गाव कामगार तलाठी उपस्थित होते.

यावेळी अकलूज भाग क्रमांक नवीन मतदान केंद्र आणि संबंधित बीएलओ यांचे नाव व भ्रमणध्वनी क्रमांक मतदारांच्या माहितीसाठी प्रसिद्धीस देण्यात आले ते याप्रमाणे अकलूज भाग क्रमांक 248 नवीन मतदान केंद्र 252 बीएलओ पी.आर. कांबळे 98 90 79 50 45, अकलूज भाग क्रमांक २४९ नवीन मतदान केंद्र 253 बीएलओ एस एस कोरबू 94 03 46 24 88, दत्तनगर अकलूज भाग क्रमांक 265 नवीन मतदान केंद्र 269 बीएलओ एस.एस राऊत 99 21 9 39 31 8,  दत्तनगर अकलूज भाग क्रमांक 266 नवीन मतदान केंद्र 270 बीएलओ एन ए साने 8208 45 66 59, दत्तनगर अकलूज भाग क्रमांक 271 नवीन मतदान केंद्र बीएलओ डी.पी. गायकवाड 7020307134, संग्रामनगर भाग क्रमांक 260 नवीन मतदान केंद्र 264 बीएलओ एस.बी. मुंगुसकर 97 63 71 53 73 संग्रामनगर भाग क्रमांक 261 नवीन मतदान केंद्र 265 बीएलओ यु टी पवार 97 63 050822, संग्रामनगर भाग क्रमांक २६२ नवीन मतदार केंद्र 266 बीएलओ गणेश सुतार 99 22 60 13 87, संग्रामनगर भाग क्रमांक 263 नवीन मतदान केंद्र 267 बीएलओ पी. बी. कांबळे 70 20 64 47 74, माळेवाडी भाग क्रमांक 233 230 नवीन मतदान केंद्र क्रमांक 234 बीएलओ एस.एच. देवकाते 9404690856, माळेवाडी भाग क्रमांक 231 नवीन मतदान केंद्र 235 बी एल ओ व्ही व्ही अस्वरे 96 65 1022 21, पर्यवेक्षक सीएस भोसले मंडल अधिकारी अकलूज 88 47 77 700 7, के एच शिंदे तलाठी अकलूज 98 50 80 74 00, जी एस भानवसे तलाठी अकलूज 99 21 65 95 53, श्रीमती एस.एन. निकम तलाठी बागेवाडी 70 58 0 70 106, एन एस मोरे तलाठी यशवंत नगर 70 20 46 73 00.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या