मनाची शुद्धता
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 16/8/2026 :
आपले जसे विचार असतात, तसेच आपले आचरण घडते. आचरण चांगले असण्यासाठी विचार शुद्ध असावे लागतात; त्यासाठी भरपूर वाचन करणे व चांगल्या विचारांचे श्रवण करणे अत्यंत आवश्यक असते.
आज समाजात आध्यात्मिक विचार देणारे अनेक गुरू आहेत. त्यांचे मार्गदर्शनपर विचार समाजात सकारात्मक विचारांची पेरणी करतात. अंधश्रद्धा म्हणून नव्हे, तर निर्मळ श्रद्धेने त्यांच्या मार्गदर्शनानुसार अनेक जण योग्य जीवनमार्ग अनुसरतात.
मात्र अनेकदा अशा आध्यात्मिक क्षेत्रांतून लोकांचा गैरफायदाही घेतला जातो. त्यासाठी प्रत्येकाने जागरूक राहून नेमका योग्य तोच विचार घेणे गरजेचे असते. जिथे काही अयोग्य दिसेल, त्या गोष्टी वेळीच टाळल्या तर भविष्यातील मोठे अनर्थ टळू शकतात.
आजचा संकल्प
समाजात चांगले व सकारात्मक विचार, सुसंस्कार आणि योग्य मार्गदर्शन ज्या चांगल्या माध्यमातून मिळेल, ते खुल्या मनाने स्वीकारू आणि आपले जीवन आनंदाने व समाधानाने जगू.
सौ. स्नेहलता स. जगताप.

0 टिप्पण्या