विचारधारा

 


विचारधारा

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 03/07/2026 :

शालेय जीवनात सुद्धा आपल्याला काही अडचणी येतात, त्या सोडवण्याचा आपण प्रयत्न करतो. आपल्या बालमनाला न झेपण्यासारख्या समस्या येतात तेव्हा आपण नाराज होतो.

खरे तर समस्या आल्याशिवाय त्या कशा सोडवायच्या, त्यातून मार्ग कसा काढायचा हे आपल्याला कसे कळणार? भावी आयुष्यात असे प्रसंग आल्यावर गोंधळून न जाता शांत मनाने त्या सोडवण्याचे हे प्रशिक्षणच असते.

मुलांनो, या वयात फक्त शालेय अभ्यास नसतो तर अनेक बरे-वाईट अनुभव येतात. त्यामधून योग्य-अयोग्य शिकायचे असते. निर्णयक्षमता वाढवायची असते. सर्वात महत्वाचे आत्मविश्वास कमवायचा असतो.

कोणतीही समस्या आली तरी त्यावर उपाय असतो. तो शोधून समस्या सोडवणे म्हणजे त्यामध्ये मिळवलेले यश.

सौ. स्नेहलता स. जगताप.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या