मनाची शुद्धता

 

मनाची शुद्धता

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 01/04/2026 :

आपल्या जीवनात रोज काही ना काही मतभेद होतात, वाद होतात. कोणाची मते खोडून काढली जातात तर काही प्रश्नांची तडकाफडकी उत्तरे दिली जातात. ज्यांना या गोष्टी पटत नाहीत ते शांत राहतात.

शांत राहणारे लोक दोन प्रकारचे असतात. काही का होईना आपल्याला काय करायचे या भावनेने काही शांत राहतात तर उगाच कुठे वाद घालायचा? मूर्खांच्या कुठे नादाला लागायचे? असा विचार करणारेही अनेकजण असतात.

संस्कारी लोक शक्यतो असल्या वादात पडत नाहीत. चुकीच्या लोकांच्या तोंडाला लागण्यापेक्षा व अजून नको त्या गोष्टी ऐकण्यापेक्षा शांत राहणे जास्त योग्य. याचा अर्थ ते भित्रे असतात असा मात्र मुळीच नाही.

आजचा संकल्प

आपल्यावरील संस्कार आपल्याला चुकीच्या गोष्टी करून देत नाहीत त्यामुळे आपण घाबरट आहोत असे न समजता संस्कारी आहोत हे लक्षात घेऊ व स्वतःला सिद्ध करू.

सौ. स्नेहलता स. जगताप

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या