विचारधारा

 

विचारधारा

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.

दिनांक 22/01/2026 : आपल्या सर्वांना सुगंधित फुले आवडतात. उन्हाळ्यात मोगऱ्याचा तर पावसाळ्यात जाई-जुईच्या सुगंधाने मन वेडे होते. चाफा कोणत्याही रंगाचा असो, प्रत्येकाचा सुगंध वेगळा. असे प्रत्येक फुलाचे सांगता येईल.

फुलांचा सुगंध जसे वेड लावतो तसे काहींच्या शब्दांचे असते. त्यांच्या बोलण्यात एक वेगळीच गोडी असते, स्नेह असतो, जिव्हाळा असतो जो आपल्याला वेडे करतो.

मुलांनो, बाराखडी एकच असते. त्यापासून बनणारे शब्द आपण बनवत असतो. त्यात गोडवा भरण्याचे काम आपण मनातून केले की झाले. समोरच्याचे मन आपलेसे करायला हा गोडवा उपयोगी पडतो.

आपण गोड बोलू, समोरचा आपोआप गोड बोलेल.

सौ. स्नेहलता स. जगताप

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या